शेतीचे सिंचन करणाऱ्या कृषीपंपांना सौर ऊर्जेचे बळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्र सरकारनं पंतप्रधान कुसुम सोलार योजना राबवली जाते. त्या अंतर्गत या योजनेत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्याला सौर कृषीपंपाच्या किमतीच्या ९० टक्के व अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्याला सौर कृषीपंपाच्या किमतीच्या ९५ टक्के अनुदान देण्यात येते. केंद्र आणि राज्य सरकार त्यासाठी अर्थसहाय्य करतं. 3, 5 आणि 7.5 HP क्षमतेचे सौर पंप या योजनेतून दिले जातात.
पंपासाठी जमिनीचा निकष -
अडीच एकरपर्यंत जमीन धारकास – 3 एचपी पंप
अडीच ते 5 एकरपर्यंत जमीन धारकास – 5 एचपी पंप
5 एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास – 7.5 एचपी पंप
अर्ज प्रक्रिया - ऑनलाईन
वेबसाईट - kusum.mahaurja.com/solar
या योजनेसाठी पात्रता -
पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
शेततळे, विहीर, बोअरवेल, नदी/ नाले याच्या शेजारील शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत लाभ न मिळालेले शेतकरी.
कागदपत्रे -
सातबारा उतारा, त्यावर विहिरीची किंवा बोअरची नोंद आवश्यक
आधार कार्ड
जातीचा दाखला
बँक पासबुक फोटो
पासपोर्ट आकाराचा फोटो
सामायिक सातबारा असेल तर 200 रुपयांच्या बाँडवर इतर भोगवटादारांचं ना हरकत प्रमाणपत्र
या योजनेची अधिक माहिती www.mnre.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. किंवा या टोल फ्री नंबरवर 1800-180-3333 कॅाल करूनही अधिक माहिती मिळवू शकता.
Share your comments