शेतीमध्ये यांत्रिकीकरण खूप महत्वाचे झाले असून अगदी शेतीची पूर्व मशागत ते पिकांची काढणी इत्यादी सगळी कामे आता यंत्राच्या साह्याने होऊ लागले आहेत. अगदी वेगळ्या प्रकारची यंत्रे शेती क्षेत्रात आल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. यांत्रिकीकरणाच्या फायदे शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात मिळतात.
परंतु अशी यंत्रे घेणे प्रत्येक शेतकऱ्याला परवडण्याजोगे नाही. यासाठी शासनाकडून विविध प्रकारचे योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणासाठी किंवा यंत्रे खरेदी करण्यासाठी अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते.या लेखात आपण अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेचे विषयी माहिती घेणार आहोत.
नक्की वाचा:भावांनो! नेमके काय आहे 'सीड ड्रिल मशीन'? वाचा त्याची किंमत आणि उपयोग
कृषी यांत्रिकीकरणासाठी महत्त्वाची योजना
शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणांमध्ये मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने 'स्माम' योजना सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना यंत्र खरेदीवर अनुदान देते.
कुणाला या योजनेचा लाभ घेता येतो?
या योजनेचा विचार केला तर भारतातील कोणताही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेचशेतकरी जर महिला असतील तर त्यांना देखील अर्ज करता येणे शक्य आहे. संबंधित अर्जदार शेतकरी जर ओबीसी, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असतील तर त्यांना यंत्राच्या खरेदीवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येते.
तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा तर असा करा अर्जं
1- सगळ्यात आगोदर म्हणजे तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो व यासाठी agrimachinary.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
2- ज्यावेळी तुम्ही अर्ज कराल त्यावेळी स्वतःच्या आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, जमिनीचा सातबारा उतारा, बँकेचे पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार ओबीसी किंवा अनुसूचित जाती-जमातीतील असेल तर त्यांना जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरून करा अशा पद्धतीने नोंदणी
1- सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवरून agrimachinary.nic.in या संकेत स्थळावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असलेल्या नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे.
2- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेतकरी म्हणजे फार्मर हा एक ऑप्शन दिसतो. त्यानंतर हा ऑप्शन निवडावा व त्या ठिकाणी जिथे कागदपत्रांची माहिती दिलेली असते त्या कागदपत्रांवर तुमचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादी नोंद करावे.
3- तुम्ही जर आधार कार्डचा पर्याय निवडला तर यासाठी तुम्ही कोणत्या राज्यातील आहेत याची देखील माहिती द्यावी लागते. आपण महाराष्ट्राच्या असल्यामुळे महाराष्ट्र हा पर्याय निवडल्यानंतर एक अर्ज ओपन होतो.
4- या अर्जामध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे नाव, तुमचे गाव तसेच तुमचा जिल्हा व तुमचे वय इत्यादी माहिती भरावी.
5- ही माहिती भरल्यानंतर तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सबमिट करावा. अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला त्यासंबंधीची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्याचा एक संदेश तुमच्या मोबाईलवर येतो व आपला अर्ज पूर्ण होतो.
Share your comments