केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत असतं. त्यापैकी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना (PM Kiasan Scheme) ही महत्वपूर्ण ठरत आहे. सध्या शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत 'ई-केवायसी' (PM Kisan e-KYC) करण्यासाठी धावपळ सुरू असताना दिसून येत आहे.
मात्र आठ दिवसांपासून सर्व्हर डाउन असल्यामुळे शेतकऱ्यांवर ई-सेवा केंद्रांवर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. सर्व्हर डाउन असल्यामुळे ई-केवायसी व नवीन नोंदणीही करता येत नाही. यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सव्वा लाखावर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही.
केंद्राने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली. त्या योजनेअंतर्गत वर्षाला 6 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा सरसकट शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु लोकप्रतिनिधी, शासकीय नोकरदार आणि प्राप्तिकर भरणाऱ्यांना या योजनेतून वगळले आहे.
'या' योजनेचा लाभ घेताना चुकीची माहिती देऊ नका; अन्यथा बसेल मोठा फटका
जिल्ह्यातील ४ लाख ३६ हजार ५८४ नोंदणीकृत लाभार्थींपैकी २ लाख ४२ हजार ३७ जणांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर १ लाख ९४ हजार ५४७ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे. पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना जुलैअखेर 'ई-केवायसी' पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन शेतकरी ई-केवायसी करीत आहेत. मात्र सर्व्हर डाउन असल्याने ई केवायसीत अडथळे निर्माण झाले. प्रशासनाने सर्व्हर डाउनवर तत्काळ मार्ग काढावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
शेतकरी मित्रांनो: 'या' पिकांची अशी घ्या काळजी; मिळणार भक्कळ पैसा
Share your comments