
state bank of india
स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील अग्रगण्य बँक असून ग्राहकांच्या हितासाठी कायम तत्पर अशी बँकेची ओळख आहे. बँकेच्या ग्राहकांच्या हितासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजना आहेत.अशीच एक महत्त्वपूर्ण योजना बँकेने देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणली आहे व या योजनेचे नाव आहे "उत्सव ठेव योजना" होय.
नक्की वाचा:Important: काय आहे नॅशनल पेन्शन सिस्टम? काय मिळतात या योजनेचे फायदे? वाचा सविस्तर
जर तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला सामान्यपणे केलेल्या फिक्स डिपॉझिट पेक्षा जास्त व्याज दिले जात आहे. परंतु या योजनेची अंतिम मुदत 28 सप्टेंबर 2022 पर्यंत असून या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला या मुदतीपर्यंत गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
काय आहे नेमकी ही योजना?
स्टेट बँकेने उत्सव ठेव नावाने एक हजार दिवसांची फिक्स डिपॉझिट सुरू केले आहे. यामध्ये एक हजार दिवसांचा ठेवीवर तुम्हाला स्टेट बँक वार्षिक 6.10 टक्के व्याज दर देत आहे.
नक्की वाचा:Post Office Scheme: गुंतवणूक करा रुपयात आणि काही वर्षात परतावा मिळवा लाखात, वाचा माहिती
एवढेच नाही तर ज्येष्ठ नागरिक या योजनेच्या माध्यमातून जो काही नियमित व्याजदर आहे त्यापेक्षा 0.50 टक्के अतिरिक्त व्याजदर मिळविण्यास पात्र असते यामध्ये जास्तीत जास्त दोन कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. आपण स्टेट बँकेचे सध्याचे व्याजदर पाहिले तर ते 5.65 अत्यंत पर्यंत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना 3.40-6.30 टक्के व्याज या माध्यमातून दिला जात आहे. एवढेच नाही तर स्टेट बँक सध्या पाच ते दहा वर्षाच्या कालावधीसाठी ठेवीदारांना 5.50 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.
Share your comments