नवी मुंबई: देशात महागाईने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले असून आता उदरनिर्वाह भागवणे देखील मोठं मुश्किल झाले आहे. पूर्वीच्या काळी एक रुपयात अनेक गोष्टी मिळत होत्या मात्र आजच्या काळात एक रुपयात चॉकलेट मिळणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळेच एक रुपयाचे मूल्य पूर्वीच्या तुलनेत फारच कमी झाले आहे.
असे असले तरी, आज आम्ही तुम्हाला अशा एकां भन्नाट योजनेविषयी अवगत करणार आहोत ज्याच्या माध्यमातून केवळ 1 रुपया गुंतवणूक करून तुम्हाला 2 लाख रुपये मिळू मिळतात किंवा 2 लाख रुपयांची बचतीचा लाभ तुम्हाला मिळू शकतो.
वाचून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही हे खरं आहे. सरकारची ही एक अशी योजना मानली जाते ज्यामध्ये तुम्हाला दरमहा एक रुपया म्हणजेच वर्षभरात 12 रुपये गुंतवून 2 लाख रुपयांचा विम्याचा लाभ मिळणार आहे.
मित्रांनो आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती योजना आहे (Pradhan Mantri Suraksha Vima Yojana) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. याअंतर्गत वार्षिक 12 रुपये प्रीमियम जमा केल्यानंतर त्यात 2 लाख रुपयांचा अपघात विमा मिळतं असतो.
Business Idea: 5 हजारात सुरु करा 'हा' व्यवसाय; मालक बना आणि कमवा लाखों; वाचा याविषयी
PMSB योजनेअंतर्गत अपघात झाल्यास, मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याच्या रकमेवर दावा केला जाऊ शकतो. या योजनेअंतर्गत एखाद्या विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा तो अपंग झाल्यास त्याला 2 लाख रुपये दिले जातात. यामुळे अर्धवट अपंगत्व आल्यास त्यांना 1 लाख रुपये मिळत असतात. निश्चितच ही एक कल्याणकारी योजना आहे.
प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेत 18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करण्यास पात्र असतो. म्हणजेच 18 ते 70 वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो. यामध्ये अर्ज करण्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. तुम्हाला कोणत्याही बचत खात्याद्वारे PMSBY मध्ये सामील होता येते.
Pm Kisan Yojana: पीएम किसानच्या वेबसाईटवर आली 'ही' महत्वाची माहिती; माहितीत नेमकं दडलंय काय?
इंटरनेट बँकेशी कनेक्ट करणे देखील महत्त्वाचे आहे
जर कोणी या योजनेत सहभागी होण्याचा विचार करत असेल, तर त्यामध्ये नोंदणी करण्यासाठी इंटरनेट बँकिंग सुविधा असणे आवश्यक आहे. म्हणजेच बचत खात्यात ऑनलाइन बँकिंग असणे महत्वाचे असते.
Share your comments