1. सरकारी योजना

खरं काय! मोदीच्या या योजनेत महिन्याला 210 रुपये गुंतवा, महिन्याला 5 हजार मिळतील; वाचा सविस्तर

Sarkari Yojana Information: प्रत्येक नोकरदार व्यक्ती रिटायरमेंटनंतर आनंदी जीवन जगत असते. त्यांच्या जीवनात पैशाची चिंता नसते. तुम्हाला देखील नोकरदारासारखा म्हातारंपणात चांगला पैसा जमवायचा असेल किंवा तसा विचार करत असाल तर आजची ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. मित्रांनो यासाठी खरं पाहता आम्ही नाही तर अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) तुमच्या कामात येऊ शकते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
atal pension yojana

atal pension yojana

Sarkari Yojana Information: प्रत्येक नोकरदार व्यक्ती रिटायरमेंटनंतर आनंदी जीवन जगत असते. त्यांच्या जीवनात पैशाची चिंता नसते. तुम्हाला देखील नोकरदारासारखा म्हातारंपणात चांगला पैसा जमवायचा असेल किंवा तसा विचार करत असाल तर आजची ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. मित्रांनो यासाठी खरं पाहता आम्ही नाही तर अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) तुमच्या कामात येऊ शकते.

या योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला 5000 रुपये पेन्शन दिली जाते. या योजनेंतर्गत पती-पत्नीने मिळून खाते उघडल्यास त्यांना 10000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळू शकते. आजपर्यंत चार कोटींहून अधिक लोकांनी या योजनेचा (Government Scheme) लाभ घेतला आहे. पेन्शन फंड नियामकानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात 99 लाखांहून अधिक लोकांनी अटल पेन्शन योजनेत खाती उघडली आहेत.

ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती

अटल पेन्शन योजना 9 मे 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आली.  मात्र आता 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

ज्या लोकांचे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते आहे ते त्यामध्ये गुंतवणूक करून त्यांचे म्हातारपण सहज सुरक्षित करू शकतात. अटल पेन्शन योजनेंतर्गत ठेवीदाराला 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते. या योजनेंतर्गत, तुम्हाला किमान 1000 आणि कमाल 5000 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.

किती गुंतवणूक करावी

जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला दर महिन्याला 5000 रुपये पेन्शन मिळेल. यासाठी तुम्हाला दर महिन्याला केवळ 210 रुपये जमा करावे लागतील. 1000 रुपये मासिक पेन्शन मिळविण्यासाठी, तुम्हाला दर महिन्याला 42 रुपये जमा करावे लागतील.

आयकर सवलत

अटल पेन्शन योजनेअंतर्गत, ग्राहकांना 1.5 लाख रुपयांपर्यंत कर लाभाची सुविधा मिळते. गुंतवणुकदाराचा 60 वर्षापूर्वी कोणत्याही कारणाने मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत जोडीदाराला योजना सुरू ठेवावी लागते. वयाच्या 60 नंतर जोडीदाराला एकमुश्त रक्कम मिळते.

English Summary: sarkari yojana information atal pension yojana information Published on: 23 July 2022, 07:49 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters