केंद्र आणि राज्य सरकार (state government) शेतकऱ्यांना नवनवीन शेतीबाबत प्रोत्साहन देत असते. तसेच नवनवीन योजना देखील राबवत असतं. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. महत्वाचे म्हणजे आता सरकारने शेतकऱ्यांना तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे.
यासाठी सरकारने ८ लाखाहून अधिक बियाणांच्या मिनीकिट्सचे वाटप देखील केले आहे. पावसाची उघडझाप पाहून रब्बी हंगामातील पिके, विशेषतः डाळी (Pulses) आणि तेलबिया (oilseed) यांची पेरणी लवकर होण्याची गरज निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना या लागवडीसाठी तयारी करावी लागणार आहे.
सरकारने वर्ष 2022-23 मधील रब्बी हंगामासाठी डाळी आणि तेलबिया यांच्या मिनीकिट्सचा पुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे नियमित पुरवठ्यासोबतच राज्यांमधील कमी पावसाच्या प्रदेशांवर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे.
शेत जमीन खरेदी-विक्रीमध्ये केला मोठा बदल; सरकारच्या निर्णयाने शेतकरी चिंतामुक्त
8.3 लाख मिनीकिट्सच्या (Minikits) वितरणाच्या माध्यमातून तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन सरकारकडून देण्यात येत आहे. बियाणांमध्ये पिकांची उत्पादकता 20 ते 25 टक्क्यांनी वाढवण्याची क्षमता असते. शेतीसाठी उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध झाल्यामुळं उत्पादन आणि उत्पादकता दोन्हींमध्ये वाढ झालेली पाहायला मिळणार आहे.
रब्बी हंगामासाठी राष्ट्रीय बियाणे महामंडळ तसेच नाफेड इत्यादी केंद्रीय संस्थांकडून मिनीकिट्सचे वितरण केले जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारचे संपूर्ण अनुदान मिळालेल्या केंद्रीय संस्था देखील या कामी मदत करत आहेत.
'या' औधषी वनस्पतीची एकदाच लागवड करा आणि तीन वेळा कापणी करत कमवा लाखों रुपये
मिनीकिट्स थेट शेतकऱ्यांना मोफत
मोहरीच्या बियाणांची 10.93 कोटी रुपयांची 5 लाख 75 हजार मिनीकिट्स
शेंगदाण्याच्या बियाणांची 16.07 कोटी रुपयांची 70 हजार 500 मिनीकिट्स
सोयाबीनच्या बियाणांची 11.00 कोटी रुपयांची 1 लाख 25 हजार मिनीकिट्स
करडईच्या बियाणांची 65 लाख रुपयांची 32 हजार 500 मिनीकिट्स
जवसाच्या बियाणांची 65 लाख रुपयांची 32 हजार 500 मिनीकिट्स समाविष्ट आहेत.
ही मिनीकिट्स थेट शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
महत्वाच्या बातम्या
गव्हाच्या 'या' ३ जाती शेतकऱ्यांना करतील मालामाल; फक्त १२० दिवसात देतील तब्बल ९० क्विंटल उत्पादन
'या' बाजारसमितीत सोयाबीनला मिळाला सर्वाधिक बाजारभाव; जाणून घ्या
25 सप्टेंबरपासून 'या' राशींच्या लोकांचे सोनेरी दिवस सुरु होणार; वाचा तुमचे राशीभविष्य
Share your comments