1. सरकारी योजना

सर्वोत्कृष्ट दूध उत्पादकाला केंद्र सरकार देणार 5 लाख रुपयांचे बक्षीस; 15 सप्टेंबरपर्यंत असा करा अर्ज

केंद्र सरकारकडून देशातील विविध व्यवसायांना चालना देण्यासाठी योजना राबवत आहे. देशात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याच व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन उपक्रम राबवला आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट डेअरी फार्मरला ५ लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
National Gopal Ratna Award

National Gopal Ratna Award

केंद्र सरकारकडून (Central Goverment) देशातील विविध व्यवसायांना चालना देण्यासाठी योजना राबवत आहे. देशात दुग्धव्यवसाय (Dairying) मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याच व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन उपक्रम राबवला आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट डेअरी फार्मरला (Best Dairy Farm) ५ लाखाचे बक्षीस (5 lakh prize) देण्यात येणार आहे.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय देशातील सर्वोत्कृष्ट डेअरी फार्मरचा पुरस्कार देणार आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. मंत्रालयाने देशातील सर्वोत्कृष्ट डेअरी शेतकरी ओळखण्याची आणि निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय दूध दिनानिमित्त म्हणजेच २६ नोव्हेंबर रोजी दिला जाणार आहे. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार असे या पुरस्काराचे नाव आहे. डेअरी क्षेत्रात दिला जाणारा देशातील सर्वोत्तम सरकारी पुरस्कार कोणता आहे.

Health News : जिभेचा रंग सांगणार तुमच्या आरोग्याची स्थिती; जाणून घ्या कसे ते?

15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी (National Gopal Ratna Award) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या अंतर्गत 15 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांसाठी अर्ज राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल अर्थात https://awards.gov.in द्वारे केले जाऊ शकतात.

पात्रता इत्यादींबाबत अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://awards.gov.in या वेबसाइटला भेट दिली जाऊ शकते. गाई-म्हशींच्या नोंदणीकृत जातींची नावे संकेतस्थळावरच देण्यात आली आहेत.

तीन श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातील

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाकडून तीन श्रेणींमध्ये दिले जाणार आहेत. ज्यामध्ये प्रथम श्रेणीतील देशी गाई/म्हशींची पैदास करणाऱ्या सर्वोत्कृष्ट दुग्ध उत्पादकास बक्षीस दिले जाईल. त्याचप्रमाणे द्वितीय श्रेणीमध्ये उत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ आणि तृतीय श्रेणीमध्ये उत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था/दूध उत्पादक कंपनी/दुग्ध उत्पादक शेतकरी संघटना यांना पारितोषिक देण्यात येणार आहे.

यामध्ये देशी गाई/म्हशींची पैदास करणाऱ्या सर्वोत्कृष्ट दुग्ध उत्पादकाला ५ लाख रुपये दिले जातील. सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना 3 लाख रुपये आणि सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था/दूध उत्पादक कंपनी/दुग्ध उत्पादक शेतकरी संघटना यांना 2 लाख रुपये दिले जातील. यासोबतच प्रत्येक श्रेणीत गुणवत्तेचे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्हही दिले जाणार आहे.

Weather Update: महाराष्ट्रात आजही मुसळधार पावसाची शक्यता! हवामान खात्याचा अलर्ट जारी

भारतीय जातींना प्रोत्साहन देण्याचा उद्देश

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्काराचा मुख्य उद्देश गायी आणि म्हशींच्या देशी जातींना प्रोत्साहन देणे हा आहे. या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतातील देशी गोवंशाच्या जाती खूप मजबूत आहेत आणि त्यांच्यात देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची अनुवांशिक क्षमता आहे.

"राष्ट्रीय गोकुळ मिशन (RGM)" ची सुरुवात देशात पहिल्यांदाच डिसेंबर 2014 मध्ये करण्यात आली होती, ज्याचा उद्देश देशी गोवंश जातींचे वैज्ञानिक रीतीने जतन आणि विकास करणे आहे.

राष्ट्रीय गोकुळ अभियानांतर्गत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाने यावर्षीही राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्रदान केला असून, दुग्धउत्पादक शेतकरी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सहज बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी डेअरी सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला आहे.

महत्वाच्या बातम्या:
गोपालखेड येथे जैविक कृषी निविष्ठा केंद्राचे उदघाटन; शेतकऱ्यांना होणार फायदा...
मोदी सरकारकडून स्वस्तात सोने खरेदी करायचा आज शेवटचा दिवस! 10 ग्रॅम सोन्यावर मिळवा 2186 रुपयांचा फायदा

English Summary: prize of Rs 5 lakh will be given central government to best milk producer Published on: 26 August 2022, 11:00 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters