
post office scheme
पोस्ट ऑफिसची गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. वास्तविक, शेअर बाजारात परतावा मजबूत असतो पण त्यात जोखीम पण अधिक असते. खरं पाहता, शेअर मार्केटमध्ये जोखीम असताना देखील अनेक जण गुंतवणूक करत असतात. मात्र मनगट घेण्याची क्षमता प्रत्येकाकडे नसते. अशा परिस्थितीत, तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करावी जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील आणि तुम्हाला शून्य जोखमीसह चांगले परतावा मिळेल.
तुम्हालाही अशी गुंतवणूक हवी असेल जिथे चांगला नफाही मिळेल, आणि गुंतवणूक सुरक्षित देखील असेल तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. आज आम्ही आपणास पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेविषयी सांगणार आहोत ज्यात नाममात्र रक्कम गुंतवणूक करून आपण चांगली मोठी निधी जमा करू शकणार आहात.
35 लाख रुपये मिळतील
पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतात. यामध्ये रिस्क फॅक्टरही कमी आहे आणि त्याच वेळी रिटर्नही चांगला मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशी गुंतवणूकिची योजना सांगणार आहोत ज्यामध्ये जोखीम नगण्य आहे आणि परतावा देखील चांगला मिळतोय. मित्रांनो आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना.
इंडिया पोस्टने ऑफर केलेली ही संरक्षण योजना असाच एक पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला कमी जोखमीसह चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेत तुम्हाला दरमहा 1500 रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम नियमितपणे जमा केल्यास आगामी काळात तुम्हाला 31 ते 35 लाखांचा फायदा होईल.
येथे गुंतवणुक करण्याचे काही नियम आहेत
- 19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
- या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपये असू शकते.
- या प्लॅनचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते.
- तुम्हाला प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांची सवलत मिळते.
- या योजनेवर तुम्ही कर्जही घेऊ शकता.
- ही योजना घेतल्यानंतर 3 वर्षांनी तुम्ही ती सरेंडरही करू शकता. परंतु या स्थितीत तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही.
मोकार फायदा होणार
समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. अशा परिस्थितीत, पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.
Share your comments