केंद्रसरकार सर्वसामान्य घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे योजना आखत असून अंमलबजावणी देखील करत आहे. समाजातील सर्व घटकांचे जीवनमान सुधारावे हा या योजनांमधील महत्वाचा उद्देश आहे. अशीच एक महत्त्वाची योजना केंद्र सरकारने सुरू केली होती.
या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही होय. आपल्याला माहित आहेच की या योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर मोफत दिले जातात.
या योजने मार्फत लाखो कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर चा लाभ देण्यात आला. परंतु अजून देखील बर्याच महिला अशा आहेत की त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.
बऱ्याच महिलांच्या घरी अजूनही गॅस सिलेंडर नाही. त्यासाठी आपण या लेखात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मध्ये मोफत गॅस सिलेंडर साठी अर्ज कसा करावा याबद्दल माहिती घेणार आहोत.
नक्की वाचा:मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ
'या' योजनेचा लाभ कुणाला मिळतो?
या योजनेअंतर्गत सरकार दारिद्र रेषेखालील महिलांना एलपीजी कनेक्शन देते. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेचा लाभ फक्त महिलांना दिला जातो. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांचे वय 18 वर्ष असावे.
या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या घरात या योजनेअंतर्गत इतर एलपीजी कनेक्शन असेल तर अशा स्थितीत त्यांना शासनाकडून या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
ही कागदपत्रे आवश्यक
1- उज्वला योजनेसाठी ई-केवायसी आवश्यक आहे.
2- राज्य सरकारने जारी केलेले बीपीएल रेशन कार्ड किंवा रेशन कार्ड ज्यामध्ये तुमच्याकडे दारिद्र्यरेषेखालील असल्याचा पुरावा आहे.
3- आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र आवश्यक
4- तसेच बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड आवश्यक
5- पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत असणे गरजेचे
नक्की वाचा:आता रेशन कार्डधारकांना दरवर्षी मिळणार मोफत LPG सिलिंडर, वाचा कुठे सुरु झाली ही योजना..
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम तुम्हाला या योजनेची अधिकृत संकेतस्थळ https://www.pmuy.gov.in/index.aspx ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडतो.
यामध्ये तुम्हाला कोणत्याही एका वितरकाकडून म्हणजे इंडेन, एचपी आणि भारत गॅस मिळेल, यापैकी ज्याची सुविधा तुम्हाला घ्यायचे आहे. तो पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर संकेतस्थळावर विचारलेली सर्व आवश्यक माहीती नमूद करावी लागेल.
आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर वेबसाईटवर सर्व आवश्यक कागदपत्रांची प्रत अपलोड करावी आणि फॉर्म सबमिट करावा. त्यानंतर तुम्ही दाखल केलेल्या अर्जाची पडताळणी केली जाते व यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसेल तर तुम्हाला गॅस कनेक्शन मिळते.
Share your comments