केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी पीएम स्वनिधी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी कर्ज दिले जात आहे. रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांना खेळते भांडवल कर्ज सुलभ करण्यासाठी ही योजना 1 जून 2020 रोजी सुरू करण्यात आली होती.
योजना अशा विक्रेत्यांसाठी आणली गेली होती ज्यांचा व्यवसाय कोरोना महामारी मुळे बंद झाला होता. सरकारची ही योजना त्यांना त्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास मदत करत आहे. पूर्वी रस्त्यावरील विक्रेते खाजगी अनौपचारिक संस्थांकडून चढ्या व्याजदराने कर्ज घेत होते. परंतु आता या योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.
आतापर्यंत साडेतीन हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरित
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत आतापर्यंत साडेतीन हजार कोटी होऊन अधिक रक्कम रस्त्यावर विक्री व्यवसाय करणाऱ्यांना वितरित करण्यात आली आहे.
ते म्हणाले की,पीएम स्वनिधी योजना अंतर्गत 53.7 लाख पात्र अर्ज प्राप्त झाले असून 36.6 लाख कर्ज मंजूर करण्यात आले आहे आणि त्यापैकी 33.2लाख कर्ज वितरित करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत वितरीत केलेली रक्कम तीन हजार 592 कोटी रुपये आहेआणि सुमारे 12 लाख पथ विक्रेत्यांनी त्यांच्या पहिल्या कर्जाची परतफेड केली आहे.
नक्की वाचा:Goverment Scheme:शेतकऱ्यांचा शेतमाल भरेल आता उडान,केंद्राची ही योजना ठरेल लाभदायी
या योजनेअंतर्गत कर्जावर मिळते सबसिडी
या योजनेचा मुख्य उद्देश रस्त्यावर विक्रेत्यांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी कर्ज देणे आहे.ज्या अंतर्गत दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.कर्जाची रक्कम एका वर्षाच्या आत सुलभ हप्त्यामध्ये परत केली जाऊ शकते.
वेळेवर कर्जाची परतफेड केल्यास विक्रेत्यांना वार्षिक सात टक्के अनुदान दिले जाते. विक्रेत्याने पहिल्या वेळेत कर्जाची परतफेड केल्यानंतर 20 हजार रुपयांपर्यंतचे दुसरे कर्ज घेता येते आणि त्याच प्रकारे तिसऱ्यांदा 50 हजार रुपयांचे कर्ज घेता येते.
अशाप्रकारे करा अर्ज
या योजनेच्या लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा असेल तर पीएम स्वनिधीच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. तुम्ही पहिल्यांदा कर्ज घेत असाल तर Apply loan 10k वर क्लिक करा.
जर तुम्ही वीस हजार किंवा पन्नास हजार रुपयांच्या कर्जासाठी पात्र असाल तर अनुक्रमे कर्ज लागू करा. म्हणजेच 20k,50kम्हणजे वीस हजार आणि पन्नास हजार अशा पर्यायावर क्लिक करा.त्यानंतर आवश्यक तपशील भरावा.
नक्की वाचा:शेणापाठोपाठ आता सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करणार गोमूत्र, शेतकऱ्यांचा होणार फायदा...
Share your comments