1. सरकारी योजना

PM Suryodaya Yojana : मोदींची सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा;'प्रधानमंत्री सूर्योदय योजना'काय आहे?, जाणून घ्या...

Solar Yojana : रूफटॉप सोलर योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक उत्कृष्ट योजना आहे. ज्या अंतर्गत देशातील गरीब जनतेला विजेच्या वाढत्या किमतींपासून मुक्त करण्यात मदत होईल. सरकारच्या या योजनेंतर्गत सरकार दुर्बल घटकातील कुटुंबांच्या घरांच्या छतावर रूफटॉप सोलर म्हणजेच सोलर सिस्टीम बसवणार आहे. जेणेकरून सर्वसामान्यांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळू शकेल.

Pradhan Mantri Suryodaya Yojana Update

Pradhan Mantri Suryodaya Yojana Update

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली आहे. देशवासीयांच्या घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. यासाठी केंद्र सरकारने सुमारे एक कोटी घरांच्या छतावर रुफटॉप सोलर बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये देशवासियांच्या कल्याणासाठी 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना' सुरू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

१ कोटी लोकांच्या घरांच्या छतावर सोलर रुफटॉप बसवण्यात येणार

सोमवारी अयोध्येहून परतताना पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम देशवासीयांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे रूफटॉप सोलरचा. पीएम मोदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते. आज अयोध्येतील अभिषेक प्रसंगी, भारतीयांच्या घराच्या छतावर स्वतःची सौर रूफटॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे. अयोध्येतून परतल्यानंतर, मी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे आमचे सरकार १ कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा बसवण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल.

रूफटॉप सोलर योजना काय आहे?

रूफटॉप सोलर योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक उत्कृष्ट योजना आहे. ज्या अंतर्गत देशातील गरीब जनतेला विजेच्या वाढत्या किमतींपासून मुक्त करण्यात मदत होईल. सरकारच्या या योजनेंतर्गत सरकार दुर्बल घटकातील कुटुंबांच्या घरांच्या छतावर रूफटॉप सोलर म्हणजेच सोलर सिस्टीम बसवणार आहे. जेणेकरून सर्वसामान्यांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळू शकेल.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ साठी पात्रता

सरकारच्या प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ चा लाभ देशातील फक्त त्या लोकांनाच मिळणार आहे. ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी असेल. सोप्या भाषेत या योजनेचा लाभ देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांनाच मिळणार आहे.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करावा

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ अंतर्गत तुमच्या घराच्या छतावर रुफटॉप सोलर बसवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला नॅशनल पोर्टल फॉर रुफटॉप सोलरच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर, तुम्हाला साइटच्या रूफटॉप सोलर पर्यायावर क्लिक करावे लागेल. लॉग इन करावे लागेल आणि रूफटॉप सोलरसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. लक्षात ठेवा की अर्जामध्ये विचारलेली माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल. अन्यथा सरकारच्या या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता.

English Summary: PM Suryodaya Yojana Pradhan Mantri Suryodaya Yojana pm modi news Published on: 23 January 2024, 11:55 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters