PM kisan
PM Kisan Yojana: केंद्र सरकारकडून (Central Govt) देशातील शेती (farming) क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याचा फायदा देशातील लाखो शेतकऱ्यांना (farmers) होत आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६००० हजार रुपये ४ हफ्त्यांमध्ये दिले जातात.
शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणे अपेक्षित होते, मात्र काही कारणांमुळे त्यास विलंब होत आहे. ताज्या अपडेटनुसार, या योजनेचा पुढील हप्ता (Next installment) सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जारी केला जाईल.
12वा हप्ता मिळण्यास उशीर का होतोय?
पीएम किसान योजनेतील अनियमितता रोखण्यासाठी मोदी सरकारने ई-केवायसी (E-KYC) अनिवार्य केले आहे. यापूर्वी ई-केवायसीची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट ठेवण्यात आली होती, मात्र आता तीही काढून टाकण्यात आली आहे.
पीएम किसान पोर्टलवर (PM Kisan Portal) अजूनही ई-केवायसी करता येते. याशिवाय राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची भुलेख पडताळणी केली जात असल्याने बाराव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचण्यास विलंब होत आहे.
पशुपालकांनो घ्या काळजी! देशात 18.5 लाख जनावरांना लम्पीची लागण; एकाच राज्यामध्ये 12.5 लाख प्रकरणे
लाभार्थी यादीत तुमचे नाव येथे तपासा
जर तुम्ही पीएम किसान योजनेच्या 12व्या हप्त्यासाठी नोंदणी केली असेल आणि तुम्हाला तुमचे नाव लाभार्थी यादीत पाहायचे असेल, तर तुम्ही प्रथम पीएम किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा.
होम पेजवर मेनूबारवर जा आणि 'फार्मर कॉर्नर' वर जा. येथे लाभार्थी यादीवर क्लिक/टॅप करा. येथे तुम्ही विनंती केलेली माहिती सबमिट करून लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहू शकता.
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण! पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग; जाणून घ्या नवीनतम दर
पीएम किसान योजनेशी संबंधित समस्यांसाठी येथे संपर्क साधा
लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहिल्यानंतरही, तुम्हाला 12व्या हप्त्याबाबत काही शंका किंवा तक्रारी असल्यास, तुम्ही पीएम किसान योजना हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही तुमची तक्रार ई-मेल आयडी ([email protected]) वर मेल करू शकता.
महत्वाच्या बातम्या:
1 जुलै 2022 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा आदेश जारी? सरकारने दिली ही माहिती
थंडी शेतकऱ्यांच्या फायद्याची, थंडीत 'ही' पिके घेऊन ३ महिन्यात कमवा बक्कळ नफा
Share your comments