PM Kisan Yojana: केंद्र सरकारने (Central Govt) चार दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात १२ वा हफ्ता (12th Installment) जमा केला आहे. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काही हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. त्यावर फोन करून शेतकरी त्यांची तक्रार नोंदवू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी दिवाळीपूर्वी 8 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांचा 12 वा हप्ता हस्तांतरित केला आहे. मात्र चार दिवस उलटूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचलेले नाहीत.
अशा स्थितीत त्यांच्या खात्यात हप्ता का आला नाही, अशी चिंता त्या शेतकऱ्यांना सतावत आहे. तुमची समस्या सोडवण्यासाठी तुम्ही अधिकृत ईमेल आयडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधू शकता.
तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर देखील संपर्क साधू शकता. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर पुढील हप्त्यात तुमच्या खात्यात 12 व्या हप्त्याची रक्कम जोडली जाऊ शकते.
एकच नंबर! शेतामध्ये बसवा हे आधुनिक उपकरण; हवामान आणि कीड ओळखून करेल मोबाईलवर अलर्ट
वास्तविक, केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6,000 रुपये पाठवते. ही रक्कम दर 4 महिन्यांनी 2000-2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये पाठविली जाते. जर तुम्ही PM किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यावर मदत पोहोचली नसेल, तर याची काही कारणे असू शकतात.
तुम्ही तुमची हप्त्याची स्थिती स्वतः देखील तपासू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान www.pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. इथे गेल्यावर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल.
त्यावर क्लिक करा आणि Beneficial Status हा पर्याय निवडा. त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि Get Data वर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या हप्त्याची स्थिती कळेल. जर पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही टोल फ्री हेल्पलाइनचीही मदत घेऊ शकता.
मंत्रालयाशी संपर्क कसा साधायचा
पीएम किसान टोल फ्री क्रमांक- 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक- 155261
पीएम किसान लँडलाइन नंबर- ०११-२३३८१०९२, २३३८२४०१
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन- ०११-२४३००६०६
पीएम किसान दुसरी हेल्पलाइन- ०१२०-६०२५१०९
ई-मेल आयडी- pmkisan-ict@gov.in
पीएम किसान निधीच्या पैशासाठी eKYC आवश्यक आहे
पीएम किसान पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता मिळविण्यासाठी त्यांना eKYC करणे अनिवार्य असल्याचे सर्व शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर ही रक्कम तुमच्या खात्यात येणार नाही. म्हणून ते तपासा आणि जर ई-केवायसी पूर्ण झाले नसेल तर ते त्वरित करा. त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येतील.
कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! DA वाढीसह आणखी एक आनंदाची बातमी, आता प्रमोशनही होणार...
eKYC करूनही पैसे आले नाहीत, मग करा हे काम
तुम्ही पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत तुमची स्थिती आणि लाभार्थी यादी देखील तपासली पाहिजे. लाभार्थी यादी तपासल्यानंतर तुमचे नाव दिसत नसेल, तर तुमच्या अर्जात त्रुटी असण्याची शक्यता आहे. हे दुरुस्त करण्यासाठी, तुम्ही पोर्टलवर आणि जवळच्या कृषी सहाय्य केंद्रावर ऑफलाइन जाऊन सुधारणा करू शकता.
PM किसान सन्मान निधी योजनेची स्थिती याप्रमाणे तपासा
1.सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
2.यामध्ये होम पेजवर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर हा पर्याय निवडावा लागेल.
3.यामध्ये तुम्हाला लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागेल.
4.ड्रॉप डाउन वर क्लिक करा.
5.आता त्यात राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
6.यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल.
7.जर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल तर अर्जात काही तफावत असण्याची शक्यता आहे.
8.तुमच्या जवळच्या कृषी सहाय्य केंद्रावर जा आणि पोर्टल किंवा ऑफलाइनच्या मदतीने त्रुटी दूर करा.
महत्वाच्या बातम्या:
दिलासादायक! दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल डिझेल स्वस्त; पहा किती रुपयांनी झाले स्वस्त
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीदारांचे नशीब चमकले! सोने 6000 रुपयांनी स्वस्त...
Share your comments