PM Kisan Yojana : मोदी सरकारने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पीएम किसान योजना (PM kisan Yojna) सुरु केली. यामुळे अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळतात. आतापर्यंत या योजनेचे ११ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता शेतकऱ्यांना 1२ व्या हप्त्याचे वेध लागले होते. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
बाराव्या हप्त्याचे पैसे कधी येणार?
पीएम किसान योजनेअंतर्गत (PM KISAN SCHEME) १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीसाठी शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम दिली जाते. त्याच वेळी, दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान हस्तांतरित केले जातात.
याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान ट्रान्सफर केले जातात. आता अशी माहिती मिळत आहे की, 2022 च्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 सप्टेंबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 लाख देणारच! शेतकऱ्यांसाठी 15 लाखांची घोषणा..
12वा हप्ता हवा असेल तर आधी हे काम करा
आता जर तुम्हाला बारावा हप्ता हवा असेल तर आधी हे काम करा. सरकारने अलीकडेच ई-केवायसीची ( eKYC) अंतिम मुदत 31 मे ते 31 जुलै 2022 पर्यंत वाढवली आहे. जे शेतकरी 11 तारखेनंतर 12 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, त्यांनी ई-केवायसी करणे खूप गरजेचे आहे.
घरी बसून ई-केवायसी पूर्ण करू शकता
1. यासाठी PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा.
2. येथे तुम्हाला शेतकऱ्यांच्या (Farmer) कोपऱ्यावर प्रथम eKYC ची लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल.
3. येथे तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि शोध बटणावर क्लिक करा.
4. यानंतर मोबाईल नंबर टाका, इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की तुम्हाला तोच नंबर टाकावा लागेल जो आधारशी लिंक आहे.
5. यानंतर OTP टाका. त्यानंतर तुमचे eKYC पूर्ण होईल.
6. तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करण्यात काही अडचण आल्यास तुम्ही आधार सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता.
महत्त्वाच्या बातम्या:
LPG Gas Price Hike : घरगुती गॅस सिलेंडर दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर
आता सरपंच पुन्हा जनतेतून? नवीन सरकार निर्णय घेण्याची शक्यता
Share your comments