1. सरकारी योजना

PM Kisan: 2 हजार रुपये या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत; या मध्ये तुमचा तर समावेश नाही ना ? जाणून घ्या

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन 2018 मध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजना सुरू केली. आतापर्यंत कोट्यवधी शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत, ज्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या रूपात दोन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

PM Kisan

PM Kisan

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन 2018 मध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजना सुरू केली. आतापर्यंत कोट्यवधी शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत, ज्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या रूपात दोन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

या शेतकऱ्यांचा 13 वा हप्ता अडकू शकतो

अलीकडेच, केंद्र सरकारने PM किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या PM किसान खात्याचे e-KYC करणे अनिवार्य केले आहे. सरकारने पीएम किसान खात्याच्या ई-केवायसीसाठी 31 जुलै 2022 ही अंतिम तारीख निश्चित केली होती.

ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या PM किसान खात्याचे ई-केवायसी या निश्चित मुदतीत केले नाही, त्यांचे 13 व्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात.

राम मंदिरासंदर्भात मोठी बातमी... राम मंदिर उद्घाटनाची तारीख ठरली, अमित शहांनी केली घोषणा

तुमच्या स्टेटसमध्येही हा मेसेज दिसत आहे का?

पीएम किसान योजनेअंतर्गत 13व्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान पोर्टलच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.

यानंतर, तुम्हाला होम पेजवर फार्मर्स कॉर्नरवर उपलब्ध 'लाभार्थी यादी' या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर, तुम्हाला येथे राज्य, जिल्हा, तहसील आणि गावाची माहिती द्यावी लागेल.

ही सर्व माहिती सबमिट केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक यादी उघडेल. तुम्ही या यादीत तुमचे नाव तपासू शकता.

तुमच्या स्टेटसमध्ये ई-केवायसी समोर 'नाही' असा मेसेज दिसत असेल, तर तुमचे 13व्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात.

Unseasonal rain : या जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेतकरी चिंतेत

13व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होतील ते जाणून घ्या

ऑक्टोबर 2022 मध्ये केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला. या अर्थाने, चार महिन्यांच्या कालावधीनंतर, 13 व्या हप्त्याचे पैसे फेब्रुवारीच्या शेवटच्या दोन आठवड्यांतील कोणत्याही दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाऊ शकतात.

English Summary: PM Kisan: These farmers will not get 2 thousand rupees Published on: 06 January 2023, 07:16 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters