1. सरकारी योजना

Pm kisan : पीएम किसानच्या १६ व्या हप्तापासून काही शेतकरी मुकणार; जाणून घ्या काय आहे चूक

Pm kisan News : पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक कोटी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित करण्यात आले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १५ व्या हप्त्या थेट बँक हस्तांतरण (DBT) द्वारे ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १८ हजार कोटींहून अधिक रक्कम पाठवण्यात आली होती.

pm kisan status news

pm kisan status news

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशातील अनेक शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत असून शेतकऱ्यांना १५ हप्ते मिळाले आहेत. लवकरच १६ हप्ता देखील मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर १६ व्या हप्तापासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी अद्यापही अपूर्ण राहिले आहे असे शेतकरी यापासून वंचित राहू शकतात. तसंच या शेतकऱ्यांना १६ हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत या योजनेचे पैसे वेळेवर मिळवायचे असतील तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा.

कोणते शेतकरी १६ व्या हप्तापासून मुकणार?
पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता लवकरच जारी होणार आहे. येत्या काही महिन्यांत हा हप्ता जारी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण यावेळी १६ वा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता कमी आहे. त्याचे कारण आहे की त्याच्याकडून काही चुका झाल्या आहेत. तसंच ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत. यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी अर्जात चुकीची माहिती दिली असेल तर त्याही शेतकऱ्यांना १६ हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक कोटी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित करण्यात आले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १५ व्या हप्त्या थेट बँक हस्तांतरण (DBT) द्वारे ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १८ हजार कोटींहून अधिक रक्कम पाठवण्यात आली होती.

आता शेतकऱ्यांनी काय करावं
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांनी पुढील हप्ता जारी होण्यापूर्वी ई-केवायसी किंवा अर्जात झालेल्या चुका सुधारणे गरजचे आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी पीएम किसान लाभार्थी स्थिती तपासली पाहिजे. ज्याद्वारे त्यांना त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही याची माहिती मिळेल. तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रात किंवा जवळच्या बँकेला भेट देऊन ई-केवायसी करून घेऊ शकता. याशिवाय तुम्ही हे काम स्वतः घरी बसून पीएम किसान पोर्टलच्या माध्यमातून करू शकता. यासाठी वेबसाइटवर दिलेल्या ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा आणि पुढील प्रक्रिया करा.

अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा
या योजनेशी संबंधित कोणत्याही समस्या असल्यास, शेतकरी हेल्पलाइन क्रमांक - १५५२६१ किंवा १८००११५५२६ (टोल फ्री) किंवा ०११-२३३८१०९२ द्वारे संपर्क करू शकतात. याशिवाय, तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेलवर संपर्क साधू शकता.

English Summary: Pm kisan Some farmers will miss out from the 16th installment of PM Kisan Find out what is wrong Published on: 06 January 2024, 12:28 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters