मोदी सरकारने (Modi Sarkar) शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना दोन हजाराच्या एकूण तीन हफ्त्यात दिले जातात.
खरं पाहता ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे या हेतूने सुरु करण्यात आली होती. मात्र मध्यंतरी अनेक अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा उचलला, यामुळे केंद्र सरकारने या योजनेत मोठा अमुलाग्र बदल घडवून आणला. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी बांधवांना ई-केवायसी (E-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
योजनेसाठी केवायसी करण्याची अंतिम मुदत ही याआधी 31 मार्च ठेवण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना केवायसी करता येणे शक्य नव्हते. म्हणुन केंद्र सरकारने यामध्ये मुदतवाढ देत 31 मे ही केवायसी करण्यासाठी अंतिम तारीख ठरवली. मात्र तरी देखील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आवश्यक केवायसी केली नाही. यामुळे आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने यामध्ये मुदतवाढ देत 31 जुलै ही तारीख अंतिम तारीख ठरवली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या 'या' योजनेच्या माध्यमातून मिळणार 50 हजार रुपये, वाचा सविस्तर
दरम्यान या योजनेचा शेवटचा म्हणजेच अकरावा हफ्ता 31 मे ला देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आला आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, केंद्र सरकारने ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केलेली नाही त्यांच्या देखील खात्यामध्ये अकराव्या हफ्त्याचे दोन हजार रुपये हस्तांतरित केले आहेत.
मात्र असे असले तरी आता शेतकरी बांधवांना 31 जुलैपर्यंत या योजनेसाठी आवश्यक केवायसी करावी लागणार आहे. निश्चितच शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी पुन्हा एकदा केंद्र सरकारने या योजनेसाठी आवश्यक केवायसी करणे हेतू मुदतवाढ दिली असल्याने या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकरी या दोन प्रकारे केवायसी करू शकतात
पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी, शेतकरी त्यांचे बँक खाते केवायसी दोन प्रकारे करू शकतात. ज्या अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी ज्यांचे बँक खाते आधार आणि मोबाईलशी जोडलेले आहे, ते मोबाईल OTP द्वारे KYC करू शकतात.
अशा शेतकऱ्यांना पीएम किसानच्या वेबसाइटवर जावे लागेल, जिथे केवायसीसाठी अर्ज केल्यानंतर, नोंदणीकृत मोबाइलवर एक ओटीपी येईल, जो वेबसाइटवर अपलोड केला जाईल आणि केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दुसरीकडे, इतर शेतकरी देखील जवळच्या सीएसी सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करू शकतात.
Share your comments