शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. यामुळे त्यांना कर्जाची गरज असते. यामुळे सरकारकडून त्यांना कर्जासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवलय जातात. सरकार कडून शेतकऱ्यांना अनुदान, कर्ज देण्यापासून ते कृषी उपकरणांपर्यंत सर्वतोपरी मदत करत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होतो.
असे असताना आता बँकांकडूनही शेतकऱ्यांसाठी कर्ज देण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. आता पंजाब नॅशनल बँकेने मोबाईलद्वारे मिस्ड कॉल देऊन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे याचे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पीएनबीने एक ट्विट करत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या या कर्जासंबंधीची संपूर्ण माहिती दिली आहे.
कृषी कर्जासाठी अर्ज कसा करायचा??? संपूर्ण माहिती जाणून घ्या. शेतकऱ्यांना अशा प्रकारे करता येईल अर्ज, अशी माहिती त्यांनी दिली आहे. देशातील शेतकऱ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने कर्ज देण्याची ऑफर पीएनबीने दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अत्यंत सोप्या आणि माफक अटींद्वारे शेतीसाठी कर्ज घेता येईल. कर्ज घेण्यासाठीची खालीलप्रमाणे आहे.
एका वेताला 3500 लिटर पर्यंत दूध, फुले त्रिवेणी गाईच्या जातीमुळे शेतकरी मालामाल..
56070 वर 'Loan' असे लिहून SMS करा.
18001805555 वर मिस कॉल द्या.
18001802222 वर कॉल सेंटरशी संपर्क साधा.
नेट बँकिंग वेबसाइट https://netpnb.com द्वारे अर्ज करा.
PNB One द्वारे अर्ज करा.
मोदी सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये सरकारकडून दिले जातात. तसेच थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम पाठवली जाते. याचा देशातील करोडो लोकांना फायदा होत आहे. त्याच प्रमाणे किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना अगदी नाममात्र व्याजावर 3 लाख रुपये देते.
अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत, कृषी महोत्सवासाठी पाच कोटी मागितल्याने कृषी आयुक्तालयात खळबळ
तसेच कृषी सिंचाई योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते आहे. शेतकऱ्यांना या योजनेद्वारे ठिबक आणि तुषार सिंचन तंत्रावर अनुदान दिले जाते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना अधिकृत वेबसाइट https://pmksy.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. यामुळे या योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
इलेक्ट्रिक कारच्या किमती नवीन वर्षात वाढणार, जाणून घ्या कारण..
मदर डेअरीकडून दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची तब्येत बिघडली, एम्स रुग्णालयात दाखल
Share your comments