मित्रांनो भारत सरकार भारतातील जनतेच्या हितासाठी कायमच नाविन्यपूर्ण योजना अमलात आणत असते. 2014 मध्ये सत्तेत आलेली मोदी सरकार (Central Government Scheme) देखील भारतीय जनतेच्या (Indian Citizens Scheme) हितासाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करीत आहे. आज आपण मोदी सरकारच्या एका महत्त्वाच्या योजनेविषयी जाणून घेणार आहोत.
मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे, वाढत्या वयानुसार प्रत्येक व्यक्तीच्या मनात निवृत्तीची चिंता सतावू लागते. होय, प्रत्येकजण भविष्यात मिळणाऱ्या पेन्शनबद्दल खूप चिंतित असतो. पण आता तुम्हाला तुमच्या पेन्शनची चिंता करण्याची गरज नाही.
कारण पंतप्रधानांनी अशी योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत आता लाभार्थींना दरमहा 3000 रुपये मासिक पेन्शन दिली जाणार आहे. सरकारने सुरू केलेल्या या योजनेचे नाव पीएम श्रम योगी मान धन योजना (PM Shram Yogi Man Dhan Yojana) आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचा लाभ कसा घ्यावा.
महत्वाच्या बातम्या:
याला म्हणतात सक्सेस! रिटायर्ड ऑफिसरने सुरु केला शेळीपालन व्यवसाय; आज वार्षिक एक कोटींची उलाढाल
लई भारी! नोकरीला लाथ मारली अन शेती सुरु केली; आज करतोय चांगली कमाई
काय आहे पीएम श्रम योगी मानधन योजना?
पीएम श्रम योगी मानधन योजना (PMSYM) ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी कामाची योजना आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती.
या योजनेअंतर्गत, लाभार्थींना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मासिक पेन्शन दिली जाते. या योजनेद्वारे लाभार्थींना 3,000 रुपये पेन्शन दिले जातं असते. ही योजना विशेषतः मजूर वर्गातील लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे जसे - रस्त्यावर विक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी मजूर, कागद वेचणारे, धोबी, रिक्षाचालक इत्यादी.
अर्ज कसा करावा
»या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना प्रथम PM श्रम योगी मानधन योजनेच्या (PMSYM) अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे.
»यानंतर वेबसाईट वर गेल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.
»यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रांसह, मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड
अर्जदाराचे ओळखपत्र
बँक खाते पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्जदाराचा पूर्ण पत्ता
याशिवाय आधार कार्डला रजिस्टर असणारा मोबाईल नंबर लागणार आहे.
पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा असंघटित क्षेत्रातील कामगार वर्गातील असावा.
याशिवाय कामगाराचे मासिक उत्पन्न किमान 15000 रुपये असावे.
याशिवाय, अर्जदाराची किमान वयोमर्यादा 18 वर्षे असावी. आणि कमाल वयोमर्यादा 40 वर्षे असावी.
लाभार्थ्याकडे आधार कार्ड आणि बचत बँक खाते किंवा जन धन बँक खाते (IFSC कोडसह) असणे आवश्यक आहे.
Share your comments