पोस्ट ऑफिसच्या (post office) अशा अनेक योजना आहेत. ज्यामधून शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना चांगले फायदे मिळतात. केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. आज आपण अशाच एका योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना जास्त नफा मिळतो. भारतीय टपाल कार्यालयामार्फत वृद्धांसाठी चालविल्या जाणाऱ्या महत्वाच्या योजनेविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
आपण ज्येष्ठ नागरिक बचत योजनेविषयी बोलत आहोत. सरकारची गॅरेंटी (government guarantee) असल्याने ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे. 60 वर्षे किंवा त्याहून जास्त वय असलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येईल. यानंतरच त्यांना या योजनेत गुंतवणूक करता येईल.
या योजनेमध्ये वार्षिक 1 हजार ते 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. Senior Citizen Savings Scheme योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा 5 वर्षांचा आहे.
धनु आणि मकर राशींना होणार धनलाभ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
FD पेक्षा जास्त व्याजदर मिळणार
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील व्याजदर हा बहुतांश बँकांच्या (bank) FD पेक्षा जास्त आहेत. यामुळेच यामध्ये पैसे गुंतवणे जास्त फायदेशीर ठरू शकेल. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून वार्षिक 7.4 टक्के रिटर्न दिला जातो आहे.
5 वर्षांसाठी निश्चित व्याजदर
जर आज या योजनेअंतर्गत खाते उघडले तर पुढील 5 वर्षांसाठी आपल्याला 7.4 टक्के व्याज मिळेल. जर या योजनेतील गुंतवणुकीची जास्तीत जास्त लिमिट 15 लाख रुपये असेल, तर या रकमेवर वार्षिक 1.11 लाख रुपयांचे व्याज मिळेल. विशेष म्हणजे व्याज दर तिमाहीला दिले जाते. त्यामुळे दर तीन महिन्यांनी 27,750 रुपये मिळतील.
शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के अनुदान; आजच करा अर्ज
पती-पत्नी दोघांनाही करता येईल गुंतवणूक
या योजनेमध्ये पती-पत्नी या दोघांनाही गुंतवणूक करता येईल. तसेच जर या दोघांनी एकत्र पैसे गुंतवले तर गुंतवणुकीची रक्कम दुप्पट होईल. मात्र, केंद्र सरकारकडून (central government) दोघांनाही वेगवेगळ्या मर्यादा दिल्या आहेत.
म्हणजेच पतीला15 लाख आणि पत्नीला 15 लाख गुंतवता येतील. आपल्या 30 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर वार्षिक 7.4 टक्के दराने 2.22 लाख रुपये व्याज मिळेल. जो पूर्णपणे जोखमी फ्री असेल.
महत्वाच्या बातम्या
रब्बी हंगामातील कडधान्यांचे उत्पादन वाढणार; सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
फक्त 999 रुपयांमध्ये इलेक्ट्रिक बाइक करा खरेदी; नवीन 'URBN' इ-बाइक लॉन्च
दिलासादायक! पुणे बाजार समितीमध्ये मटारला मिळाला तब्बल 15 हजारांचा कमाल भाव
Share your comments