शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करत असते. आता महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी (farmers) एक दिलासादायक निर्णय घेतला आहे.
शेतीसाठी कर्ज न मिळाल्याने अनेक शेतकरी सावकारांकडून कर्ज घेतात आणि कर्जात अडकतात. या पार्श्वभूमीवर विदर्भ व मराठवाडय़ातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाने 1 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार (mahavikas aaghadi government) राज्यात येताच राज्यातल्या शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 'महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019'ची घोषणा केली होती.
हे ही वाचा
Business: फक्त 10 हजार रुपयात सुरू करा 'हा' व्यवसाय, वर्षभर होईल कमाई
सप्टेंबर 2019 पर्यंत या योजनेअंतर्गत प्रतिशेतकरी दोन लाख रुपयांच्या कमाल मर्यादेत शेतकऱ्यांना लाभ देण्याची घोषणा उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत केली होती. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची नियमित परतफेड केली आहे.
अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत योजनाही (scheme) जाहीर केली होती. शेतीच्या कामांसाठी अनेक शेतकरी खासगी सावकारांकडून कर्ज घेतात. हे कर्ज माफ करण्यास महाविकास आघाडी सरकारने जिल्हास्तरीय समिती नेमली होती.
या समितीने विदर्भ व मराठवाडय़ातल्या 14 जिह्यांतील 3 हजार 749 कर्जदार शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी 9 कोटी रुपयांची शिफारस केली आहे. त्यातील एक कोटी रुपयांचा निधी (fund) वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
Mosambi Disease: पिकावर झपाट्याने होतोय रोगांचा प्रादुर्भाव; आताच करा उपाययोजना, अन्यथा होईल नुकसान
RashiFuture: 'या' राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता; जाणून घ्या राशिविषयी...
Post Office: पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; लागू झाला 'हा' नवीन नियम
Share your comments