सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. यामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. यामध्ये मुलींना 50 हजार रुपये दिले जातात.
यामध्ये पालकांना आपल्या मुलीच्या जन्मानंतर तिला १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत ५० हजार रुपये शासनाकडून मिळणार आहेत. तसेच दोन मुली असलेल्या कुटुंबालाही या योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पालक आणि मुली हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत आई आणि मुलींच्या नावे संयुक्त बँक खाते उघडले जाईल. त्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत.
यामध्ये रु. १ लाख अपघात विमा पॉलिसी आणि रु. ५ हजार ओव्हरड्राफ्ट जमा केला जाईल. दोन मुली असल्यास प्रत्येकी २५ हजार रुपये दिले जातील. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत राज्य सरकारने दिलेला पैसा मुलींच्या शिक्षणासाठी वापरता येणार आहेत.
यामुळे त्यांच्या शिक्षणाला हातभार लागणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
तुम्ही मांझी कन्या भाग्यश्री योजना फॉर्म डाउनलोड करणे आवश्यक आहे. तो वेबसाइटवर उपलब्ध असेल. अर्ज डाऊनलोड केल्यानंतर तो भरून महिला आणि बाल विकास कार्यालयात पाठवण्यापूर्वी आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत. अशी याची प्रोसेस आहे.
अर्जदाराकडे आधार कार्ड, आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक, मोबाईल फोन नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. यामुळे ही एक फायदेशीर योजना आहे.
महत्वाच्या बातम्या;
बीन्सच्या शेतीतून मोठी कमाई, अवघ्या 6 महिन्यांत 13 लाखांपर्यंतचा नफा..
कृषी क्षेत्रातील पायाभूत कामांसाठी पतपुरवठा सुधारा, रिझर्व्ह बॅंकेने इतर बॅंकांचे टोचले कान...
मुख्यमंत्र्यांची शेंद्रीय शेती! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले शेतात..
Share your comments