केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवून आर्थिक दिलासा देत असते. यामधीलच एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज दिले जाते.
किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही केंद्र सरकारद्वारे आर्थिक मदत करण्यासाठी चालवली जाणारी योजना आहे. या क्रेडिट कार्डद्वारे (Kisan Credit Card) शेतकरी शेतीच्या कामासाठी किंवा त्यांच्या गरजांसाठी कमी व्याज दरात कर्ज घेऊ शकतात.
या योजनेद्वारे शेतकऱ्यांना हमीभावाशिवाय 1.6 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे 3 वर्षात शेतकरी याद्वारे 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. कर्ज वेळेवर फेडल्यास या क्रेडिट कार्डद्वारे व्याज देखील फक्त 4 टक्के लावले जाते.
तुमचं पीएम किसान योजनेअंतर्गत बँक खातं असणं आवश्यक आहे. सरकारनं गेल्या दोन वर्षांत विशेष मोहीम राबवून 3 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले आहेत. किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यकतेनुसार कर्ज सहज मिळू शकते.
क्रेडिट कार्डसाठी अर्ज असा करा
1) सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ अधिकृत साइटवर जा.
2) किसान क्रेडिट कार्ड फॉर्म येथे डाउनलोड करा.
3) हा फॉर्म तुम्हाला तुमच्या जमिनीची कागदपत्रे, पीक तपशीलांसह भरावा लागेल.
4) तुम्हाला इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून बनवलेले किसान क्रेडिट कार्ड मिळालेले नाही हे देखील द्यावे लागेल.
5) यानंतर अर्ज भरून सबमिट करा, त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल.
कागदपत्रांची आवश्यकता
मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.
पत्त्याच्या पुराव्यासाठी कागदपत्रे - मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ. कागदपत्रं आवश्यक.
Share your comments