गुंतवणूक दारांसाठी एलआयसीच्या योजना (LIC scheme) सर्वोत्तम ठरू शकतात. तुम्हाला कोणतीही रिस्क न घेता गुंतवणूक करायची असेल तर, एलआयसीच्या योजना क्रमांक 914 मध्ये गुंतवणूक करा. या योजनेत फक्त 2079 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर तुम्ही जबरदस्त फायदा मिळवू शकता.
योजना क्रमांक 914
भारतीय आयुर्विमा महामंडळ गुंतवणूकदारांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या विमा कंपनीवर (vima company) लोकांचा विश्वास असल्यामुळे लोक LIC मध्ये सहज गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता.
महत्वाचे म्हणजे ही सरकारी कंपनी असल्याने तिच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला जातो. आज आपण एलआयसीच्या प्लान नंबर 914 बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या पॉलिसीद्वारे तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता.
सावधान! या लोकांसाठी ठरू शकतो अडचणींचा काळ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
या योजनेतील महत्वाच्या गोष्टी
ही पॉलिसी (policy) मिळविण्यासाठी, किमान वय 8 वर्षे आणि कमाल वय 55 वर्षे असणे गरजेचे आहे. या प्लॅनमध्ये, तुम्हाला किमान 12 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्षांची मुदत घ्यावी लागेल. म्हणजेच तुम्हाला या प्लॅनमध्ये किमान 12 वर्षे गुंतवणूक करावी लागेल, तर जास्तीत जास्त 35 वर्षे गुंतवणूक करता येईल. किमान या योजनेत तुम्हाला 1 लाख रुपयांची विमा रक्कम ठेवावी लागेल.
पीएम किसान योजनेत मोठा बदल; आता 'या' शेतकऱ्यांनाच मिळणार 12 वा हप्ता
2 हजारांच्या गुंतवणुकीवर 48 लाख रुपये मिळवा
जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या १८ व्या वर्षी प्लान क्रमांक ९१४ सुरू केला तर पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचा विमा मिळेल. यासाठी तुमचा कार्यकाळ 35 वर्षांचा असणे आवश्यक आहे. या प्लॅनची (plan) किंमत वार्षिक 24391 रुपये असेल म्हणजेच प्रत्येक महिन्याला 2079 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल. या योजनेअंतर्गत 35 वर्षांनंतर गुंतवणूकदाराला 48 लाख 40 हजार रुपयांचा परतावा मिळेल.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी खास योजना; आता पोस्ट ऑफिसच्या किसान विकास योजनेत शेतकऱ्यांचा पैसा होणार डबल
भारीच की! ही एकच भाजी सर्व आजारांवर करतेय मात; एकदा खाऊन पहाच...
शेतकऱ्यांनो रब्बी कांदा लागवड करताना 'या' पद्धतीचा वापर करा; होईल चांगली कमाई
Share your comments