एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून सर्वसामान्य लोकांना चांगला परतावा मिळतो. आज आपण अशाच एका योजनेविषयी (scheme) माहिती जाणून घेणार आहोत. जी एलआयसीने अलीकडेच लाँच केली आहे.
सर्वसामान्य लोकांप्रमाणेच नोकरदार वर्ग देखील बचत किंवा गुंतवणुकीवर भर देतो. बचत आणि गुंतवणूकीसोबतच विमा पॉलिसीलाही महत्त्व दिले जाते. बहुतांश लोकांचा कल भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या योजनांकडे जास्त असतो. कारण एलआयसीने विश्वासहर्ता जपली आहे.
अलीकडेच एलआयसीनं ग्राहकांसाठी धनवर्षा पॉलिसी (policy) नावाची एक नवी योजना सुरू केली आहे. या योजनेची खास अशी वैशिष्ट्ये आहेत. ग्राहकांनी आपल्या गरजेनुसार दहा किंवा 15 वर्षांसाठी पॉलिसी टर्म निवडली तर त्यांना दमदार परतावा मिळणार आहे. धनवर्षा पॉलिसी ही एक बचत तसेच जीवन विमा योजना आहे.
महत्वाची बातमी! तब्बल 19 खतांच्या विक्रीवर राज्यात बंदी; खते खरेदी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
22 लाख रुपयांचा परतावा
समजा तुमचं वय 30 वर्ष आहे आणि तुम्ही एलआयसीच्या धनवर्षा पॉलिसी (dhan varsha policy) तर गुंतवणूक करत एकरकमी प्रिमीयम म्हणून 8,86,750 रुपये रक्कम भरली तर तुमची विमा रक्कम 11,08,438 रुपये होईल. तसेच मूळ खात्रीशीर एकूण विमा रक्कम 10 लाख रुपये होईल.
जर तुमच्या पॉलिसीचा कालावधी 15 वर्षाचा असेल तर ती मॅच्युअर झाल्यावर 21,25,000 रुपये तसेच पहिल्या वर्षादरम्यान मृत्यू झाल्यास किमान 11,83,438 रुपये आणि पॉलिसी कालवधीच्या 15 व्या वर्षी मृत्यू झाल्यास 22,33,438 रुपये तुम्हाला मिळतील.
पुढचे 2 दिवस सूर्य 'या' राशीच्या लोकांचे नशीब उजळवणार; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
एलआयसीच्या धनवर्षा पॉलिसीत ग्राहकास एकूण विमा रक्कम निवडण्याचा अधिकार मिळतो. प्रीमियम रकमेच्या 10 पटीपर्यंत विमा रक्कम निवडता येऊ शकते. याचाच अर्थ जर तुम्ही या पॉलिसीसाठी 50 हजार रुपयांचा प्रिमीयम निवडला तर तुम्ही पाच लाख रुपयांच्या विमा रकमेची पॉलिसी घेऊ शकता.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो जनावरांना योग्य आहार देऊन वाढवा रोगप्रतिकारक्षमता; होईल चांगला फायदा
शेतकऱ्याची कमाल! बिबीएफ तंत्राद्वारे घेतोय लाखों रुपयांमध्ये उत्पन्न; जाणून घ्या पद्धती
सोयाबीन दर अजूनही स्थिर; बाजारभाव वाढणार का? जाणून घ्या आजचे दर
Share your comments