चांगल्या भविष्यासाठी तुम्ही आतापासून गुंतवणूक (investment) करण्याचा करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. चांगला परतावा देणाऱ्या सुरक्षित योजनेविषयी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. आपण याविषयी आज माहिती घेणार आहोत.
देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना चालवते. एलआयसीमधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. LIC आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम पॉलिसी चालवते. यापैकी एक म्हणजे जीवन आनंद योजना.
जीवन आनंद पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम 1 लाख रुपये आहे. कमाल साठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. जीवन आनंद योजनेमध्ये पॉलिसीधारकाला अनेक प्रकारचे मॅच्युरिटी (Maturity) फायदे मिळतात. हे प्रीमियम टर्म पॉलिसीसारखेच आहे.
प्रीमियम टर्म पॉलिसी
जीवन आनंद योजनेमध्ये पॉलिसीधारकाला अनेक प्रकारचे मॅच्युरिटी फायदे (Maturity benefits) मिळतात. हे प्रीमियम टर्म पॉलिसीसारखेच आहे. याचा अर्थ असा की ज्या कालावधीसाठी तुमची पॉलिसी आहे त्या कालावधीसाठी तुम्ही प्रीमियम भरू शकता.
जीवन आनंद पॉलिसीमध्ये, किमान विमा रक्कम 1 लाख रुपये आहे. कमाल साठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. या पॉलिसीसह तुम्हाला चार रायडर्स मिळतील. अपघाती मृत्यू आणि अपंगत्व रायडर, अपघात लाभ रायडर, नवीन मुदत विमा रायडर आणि नवीन गंभीर लाभ रायडर. ही पॉलिसी घेणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची कर सूट मिळत नाही.
Cauliflower consumption: सावधान! प्रमाणापेक्षा जास्त फुलकोबीचे सेवन केल्याने होतात गंभीर समस्या
मृत्यू लाभ मिळतो
पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, नॉमिनीला पॉलिसीच्या मृत्यू लाभाच्या 125% मिळेल. त्याच वेळी, पॉलिसी धारकाचा पॉलिसीच्या मॅच्युरिटीपूर्वी मृत्यू झाल्यास, नॉमिनीला निश्चित वेळेइतके पैसे मिळतात.
25 लाख कसे मिळवायचे?
जीवन आनंद पॉलिसीमध्ये (Jeevan Anand Policy) तुम्ही महिन्याला सुमारे 1358 रुपये जमा करून 25 लाख रुपये मिळवू शकता. यासाठी तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल.
जर तुम्ही जीवन आनंद योजनेत 35 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला योजनेच्या मॅच्युरिटीवर रु.25 लाख मिळतील. यासाठी तुम्हाला दररोज ४५ रुपये वाचवावे लागतील. अशा प्रकारे, तुम्हाला महिन्याचे 1358 आणि वार्षिक सुमारे 16,300 रुपये जमा करावे लागतील.
शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय; पीक विम्यासाठी 187 कोटी मंजूर
अंतिम अतिरिक्त बोनस
तुम्ही ३५ वर्षांत एकूण ५.७० लाख रुपये जमा कराल. यामध्ये मूळ विमा रक्कम (Sum Assured) पाच लाख रुपये असेल. याशिवाय 8.60 लाख रुपयांचा रिव्हिजनरी बोनस आणि 11.50 लाख रुपयांचा अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाईल. जीवन आनंद पॉलिसीमध्ये दोनदा बोनस देखील उपलब्ध आहे. मात्र यासाठी पॉलिसी १५ वर्षांची असावी.
महत्वाच्या बातम्या
आता महावितरण ठेवणार नजर; नुकसान भरून काढण्यासाठी राबविली जाणार 'ही' मोहीम
या शुभ मुहूर्तावर करा लाडक्या बाप्पाची स्थापना; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि इतर खास गोष्टी
आजपासून ते ३ सप्टेंबर २०२२ पर्यंतचे राशीभविष्य; वाचा सविस्तर
Share your comments