सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. त्यामुळेच पैसे कोणत्या योजनेत गुंतवायचे, कुठे चांगला परतावा मिळू शकतो, याबाबत गुंतवणूक करताना गोंधळ निर्माण होतो. त्याचबरोबर अनेक वेळा माहितीअभावी अशा ठिकाणी गुंतवणूक करून मोठे नुकसान सहन करावे लागते. पोस्ट ऑफिसद्वारे अशा अनेक योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये गुंतवणूकदार पैसे गुंतवून सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळवू शकतात. ज्यात किसान विकास पत्र योजनाचा समावेश आहे. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येते.
किसान विकास पत्र योजना काय आहे -
किसान विकास पत्र योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एकरकमी गुंतवणूक योजना आहे. या योजनेत निश्चित कालावधीत पैसे दुप्पट होतात. जानेवारी 2023 मध्ये सरकारने किसान विकास पत्राचा कालावधी 123 महिन्यांवरून 120 महिन्यांपर्यंत कमी केला होता. आता ते आणखी कमी करून 115 महिने करण्यात आला आहे. म्हणजेच किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेली रक्कम 115 महिन्यांत दुप्पट होईल. किसान विकास पत्र योजना देशातील सर्व पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांमध्ये गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये किमान गुंतवणूक 1000 रुपये आहे आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही.
KVP व्याजदर किती मिळेल-
सरकार किसान विकास पत्र योजनेमध्ये वार्षिक 7.5 टक्के व्याजदर मिळते. अशाप्रकारे, जर तुम्ही किसान विकास पत्रामध्ये एकरकमी 10,000 रुपये गुंतवले, तर मॅच्युरिटीच्या वेळी ही रक्कम दुप्पट होते. म्हणजेच 20,000 रुपये मिळतील. ही गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा केली जाते.
या योजनेत पैसे कसे जमा करायचे -
10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे कोणतेही मूल किसान विकास पत्र अंतर्गत खाते उघडू शकते. फक्त ते चालवण्यासाठी त्याला पालकांची आवश्यकता असेल. खाते उघडण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा. किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते. अर्जदारांनी प्रथम अर्ज प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे फॉर्म A जो पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून मिळवता येतो. यानंतर अर्जाचे पैसे जमा करा. यानंतर, खाते उघडताच, तुम्हाला किसान विकास पत्राचे प्रमाणपत्र मिळेल.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे -
आधार कार्ड
KVP अर्ज फॉर्म
वय प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचे फोटो
मोबाईल नंबर
Share your comments