Kisan Credit Card: देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने (Central Goverment) अनेक योजना राबवल्या आहेत. त्याचा फायदा देशातील लाखो शेतकऱ्यांना (Farmers) होत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना सुरु केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कमी व्याजदराने (Low interest rates) पैसे दिले जातात.
आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत निर्धारित टार्गेट पेक्षा अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) वितरित करण्यात केंद्र सरकारला यश आले आहे. जेणेकरून अधिकाधिक शेतकऱ्यांची सावकारांच्या तावडीतून सुटका होईल. त्यामुळे शेतीसाठी स्वस्त कर्ज (Cheap loan for agriculture) मिळू लागले.
12 मे 2020 रोजी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत केंद्राने 2.5 कोटी शेतकऱ्यांना शेतीसाठी सुमारे 2.00 लाख कोटी रुपये देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. तर 3 कोटी 27 लाख 87 हजार नवीन केसीसी मंजूर करण्यात आले. या कार्डधारकांना कर्ज म्हणून 3,72,537 लाख कोटी रुपये मिळतील.
मोदी सरकारने (Modi Goverment) 2022-23 या वर्षासाठी कृषी कर्ज देण्याचे लक्ष्य 18 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवले आहे. जे गेल्या वर्षी केवळ 16.5 लाख कोटी रुपये होते. शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळावे यासाठी कर्ज देण्याचे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे.
पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना KCC योजनेचा लाभ मिळावा हा सरकारचा हेतू आहे. जेणेकरून त्यांना सावकारांकडून भरमसाठ व्याजाने पैसे घेण्यापासून स्वातंत्र्य मिळेल.
सावधान! कडधान्य आणि भाजीपाला पिकांवर रोगाचे सावट; होऊ शकते नुकसान
KCC कसे बनवायचे
सर्वप्रथम, केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना पीएम किसान योजनेशी जोडली. त्यामुळे कार्ड बनवणे सोपे झाले. पीएम किसान योजनेमुळे देशातील 11.5 कोटी शेतकऱ्यांचे महसूल रेकॉर्ड, आधार कार्ड आणि बँक खाते क्रमांकांचा डेटाबेस केंद्र सरकारकडे आला आहे.
या रेकॉर्डला केंद्रीय कृषी मंत्रालय आणि राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना 6000 रुपये मिळत आहेत. अशा परिस्थितीत केसीसीसाठी अर्ज करताना, अर्जदार शेतकरी आहे की नाही हे बँकेला सिद्ध करण्याची गरज नाही. बँक कार्ड बनवण्यास नकार देऊ शकत नाही. त्यामुळे केसीसी बनवण्याच्या प्रक्रियेला वेग आला.
बँकांवर कठोर आदेश
केंद्र सरकारने बँकांना कठोरपणे सांगितले आहे की, अर्ज मंजूर झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत किसान क्रेडिट कार्ड बनवावे लागेल. तसे करण्यात अयशस्वी झाल्यास कारवाई होऊ शकते. एवढेच नाही तर प्रक्रिया शुल्कही माफ करण्यात आले आहे.
तसेच, हमीशिवाय कर्जाची मर्यादा वाढवून ती 1 लाख रुपयांवरून 1.6 लाख रुपये करण्यात आली आहे. कार्ड बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत अर्ज करू शकता.
या कागदपत्रांची आवश्यकता असेल
ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्ट यांपैकी कोणत्याही एकाची प्रत.
तुम्ही शेतकरी असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रमाणित महसूल रेकॉर्ड द्यावा लागेल.
इतर कोणत्याही बँकेत कर्जदार नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.
किती व्याज लागेल
किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय इत्यादींसाठी वार्षिक ७ टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतचे अल्पकालीन कर्ज उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना कर्जाची वेळेवर परतफेड करण्यासाठी अतिरिक्त ३ टक्के व्याज प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे व्याजाचा प्रभावी दर वार्षिक केवळ 4 टक्के राहिला आहे. शेतीसाठी 3 लाख रुपये उपलब्ध आहेत. तर मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धनासाठी 2 लाख रुपये उपलब्ध आहेत.
महत्वाच्या बातम्या:
दुग्धउत्पादनात होणार भरघोस वाढ! या हिरव्या चाऱ्याने जनावरांच्या दुधात होतेय वाढ; जाणून घ्या...
Mushroom Farming: धिंगरी मशरूम लागवडीतून फक्त 2 महिन्यात कमवा बक्कळ पैसा; अशी करा लागवड
Share your comments