सध्या तुम्हाला माहीत आहे की, देशावर मोठ्याप्रमाणात विज संकट घोंगावत आहे. त्यामुळे शेती करत असताना पिकांच्या सिंचनाची समस्या देखील निर्माण होते व पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारी स्तरावर अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान कुसुम योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी अनुदान दिले जाते.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात 70 ते 80 टक्के अनुदानावर सौरपंप बसवता येतात व त्या माध्यमातून अनेक चांगल्या कमाईचा स्त्रोत देखील निर्माण होऊ शकतो.तुम्हीसुद्धा सरकारच्या पीएम कुसुम योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
नक्की वाचा:ई पीक नोंदणी नाहीये? तरीही काढता येणार विमा, शासनाने घेतला मोठा निर्णय
सोलर पंप बसवण्यासाठी मिळते 60 टक्के सूट
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनल बसवण्यासाठी फक्त दहा टक्के पैसे खर्च करावे लागतात. केंद्र आणि राज्य सरकार 60 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करतात. या 60 टक्के मध्ये 30 टक्के केंद्र सरकार आणि 30 टक्के राज्य सरकार असा समान प्रमाणात केला जातो
त्याचप्रमाणे बँकेकडून देखील 30 टक्के कर्ज उपलब्ध होते. शेतकरी बंधू हे कर्ज त्यांच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून सहज फेडू शकतात. या योजनेचा शेतकऱ्यांना फार मोठा फायदा झाला असून सिंचनाचा प्रश्न बऱ्याच अंशी संपला आहे.
शेतकरी विज विकून कमवतात नफा
शेतात सिंचन सोबतच सौर पंपाचा देखील वापर वीज निर्मितीसाठी करता येतो.
या योजनेद्वारे इलेक्ट्रिक किंवा डिझेलवर चालणाऱ्या सिंचन पंपाचे रुपातर सौर उर्जेवर चालणारे पंपामध्ये केले जाते. सौर ऊर्जा पॅनल मधून निर्माण होणारी वीज प्रथम त्यांच्या सिंचन कामासाठी वापरली जाईल.
याशिवाय जी अतिरिक्त वीज शिल्लक राहील, हे वीज वितरण कंपन्यांना विकता येईल. जर तुमच्याकडे चार ते पाच एकर जमीन असेल तर तुम्ही वर्षाला भरपूर वीजनिर्मिती करू शकता आणि लाखो रुपये कमवू शकता.
नक्की वाचा:Goverment Scheme:शेतकऱ्यांचा शेतमाल भरेल आता उडान,केंद्राची ही योजना ठरेल लाभदायी
Share your comments