1. सरकारी योजना

Farmer Subsidy : 'नियमात बसणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार'; अजित पवारांची माहिती

जे शेतकरी तीन वर्ष नियमित कर्ज फेडतात त्यांना सरकार अनुदान देतं. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यास काही निधी कमी पडला होता. पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत त्यासाठी मंजूर दिली आहे.

Government Scheme

Government Scheme

कोल्हापूर

'नियमात बसणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल, असं अजित पवार यांनी आज (दि.१५) स्पष्ट केलं आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान मिळत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत'. त्यावर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. कोल्हापुरात अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जे शेतकरी तीन वर्ष नियमित कर्ज फेडतात त्यांना सरकार अनुदान देतं. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यास काही निधी कमी पडला होता. पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत त्यासाठी मंजूर दिली आहे. ते मंजूर झाल्यामुळे जे नियमात बसतात त्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळेल.

शरद पवार वडीलधारे म्हणून भेटलो- अजित पवार

शरद पवारांची मी भेट घेताना लपून गेलो नाही. पवार साहेबांची मी सातत्याने भेट घेतो. तसंच भविष्यात पवारांना भेटल्यास वेगळा अर्थ घेऊ नका. शरद पवार वडीलधारे म्हणून त्यांना भेटलो. यावेळी भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. तर पुतण्याने काकांची भेट घेतल्यास यात गैर काय? असा सवाल यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. 

English Summary: Incentive subsidies will be given to farmers who fit the rules Information about Ajit Pawar Published on: 15 August 2023, 12:53 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters