शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावावा म्हणून केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असते. यामधीलच महत्वाची योजना म्हणजे पीक विमा योजना. याबाबद आता कृषी विभागाने (Department of Agriculture) शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर पीक विमा दिला जातो. अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे, मात्र तरीही बऱ्याच शेतकऱ्यांच्या पीक विमा कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे याबाबत कृषी विभागाने महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
विमाधारक शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानीची पूर्वसूचना घटना घडल्यानंतर 72 तासांच्या आत विमा कंपनीला (vima company) कळवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आता ही अट लक्षात ठेवणे महत्वाचे राहणार आहे.
आज विदर्भातील काही जिल्ह्यात 'यलो' अलर्ट जारी; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक नुकसानीच्या 72 तासात माहिती संबंधित विमा कंपनीला कळविणे महत्वाचे असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. केंद्र सरकारने खरीप व रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेत जिल्ह्यातील सव्वा दोन लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
दिलासादायक! फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर मिळणार ५०% सबसिडी; घ्या असा लाभ
पीक नुकसानीची माहिती अशी द्या
1) गुगल प्ले स्टोअरवर क्रॉप इन्शुरन्स अॅप उपलब्ध आहे. अॅपद्वारे माहिती देता येईल.
2) एचडीएफसी इर्गो कंपनीच्या १८००२६६०७०० या टोल फ्री क्रमांकावरही पीक नुकसानीची माहिती देता येईल.
3) विमा कंपनीने तालुका पातळीवर प्रतिनिधी नियुक्त केले आहेत, या प्रतिनिधींनाही माहिती देता येईल.
4) तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पूर्वसूचना देता येईल.
महत्वाच्या बातम्या
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत एकदाच रक्कम जमा करा आणि दरमहा मिळवा पेन्शन
पीएनबी किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये; असा करा अर्ज
सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर
Share your comments