सरकार (government) मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना राबवत असते. यामधीलच एक योजना (scheme) म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. मुलीचे भविष्य समृद्ध होण्यासाठी या योजेनेचा अनेक पालक लाभ घेत आहेत. मात्र आता या योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून तुम्ही 21 वर्षानंतर लाखों रुपये कमवू शकता. ही योजना केवळ मुलींसाठी सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांना फक्त दररोज 416 रुपये गुंतवावे लागतील.
नवीन नियम लागू
1) सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) दीर्घकालीन योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी खात्रीने पैसे जमा करू शकता.आता या योजनेत अनेक मोठे बदल करण्यात येत आहेत. नवीन नियमांनुसार खात्यातील चुकीचे व्याज परत करण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे.
आता तुमची पेन्शन तुम्हाला ठरवता येणार; एलआयसीची सरल पेन्शन योजना देतेय मोठी संधी
2) याशिवाय, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्याचे वार्षिक व्याज जमा केले जाईल. पूर्वीचा नियम असा होता की, मुलगी 10 वर्षांनंतरच खाते ऑपरेट (oprate) करू शकत होती. पण नवीन नियमांनुसार मुलीला 18 वर्षांच्या आधी खाते ऑपरेट करण्याची परवानगी मिळणार नाही. ऑपरेट करायचे असेल तर फक्त पालक खाते ऑपरेट करू शकतात.
'या' घरगुती उपायांनी दूर करा शरीरातील थकवा आणि अशक्तपणा; जाणून घ्या
3) यापूर्वी या योजनेत (scheme) 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ फक्त दोन मुलींच्या खात्यावर मिळत होता. तिसऱ्या मुलीला हा लाभ मिळत नव्हता. नवीन नियमानुसार एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोघींचे खाते उघडण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नवीन बदलानुसार मुलींना लाभच मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
नॅनो-फर्टिलायझर लिक्विड शेतकऱ्यांचे कष्ट आणि पैसा वाचवणार; जाणून घ्या वैशिष्ट्ये
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 40 कोटींचा निधी मंजूर; येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार
शेतकऱ्यांनो घरबसल्या सुरू करा बटाटे आणि तांदळापासून 'हा' भन्नाट व्यवसाय; जाणून घ्या सविस्तर
Share your comments