केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना (farmers scheme) राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. अशाच एका योजनेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामाद्योग मंडळाकडून मध केंद्र योजना (Madh Kendra Scheme) राज्यात सुरू करण्यात आली आहे. यासाठी पात्र व्यक्तीकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. ही माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी दिली आहे.
Tur Market Price: तूर उत्पादकांसाठी महत्वाची बातमी; बाजारातील चित्र बदलले, मिळतोय 'हा' दर
पात्र शेतकरी
वैयक्तिक मधपाळासाठी अर्जदार साक्षर असावा, स्वताची शेती असावी, वय 18 पेक्षा जास्त असावे. यासाठी केंद्र चालक प्रगतशील मधपाळामध्ये संस्था किंवा व्यक्ति अर्ज करू शकतात.
प्रगतशील मधपाळ असावा, त्यांची शैक्षणिक पात्रता निधान 10 वी पास आणि वय मर्यादा 21 पेक्षा जास्त असावे.
त्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर जमीन असावी. किंवा भाडेतत्वावर जमीन असावी.
या नंतर मधकेंद्र योजनेच्या (Madh Kendra Scheme) नियमाप्रमाणे निवडीनंतर 50 टक्के रक्कम भरल्यानंतरच मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. आणि अनुदान (subsidy) ही मिळते.
यासाठी साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक करणे आवश्यक आहे. मध पालनानंतर 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
Sweet Potato: रताळ्याचे सेवन केल्याने बीपी राहतो नियंत्रित; आणखी आहेत आश्चर्यकारक फायदे
प्रक्रिया
लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय (Honey business) सुरु करण्यासंबंधी मंडळास बंध पत्र लिहून द्यावे लागेल. 50 टक्के स्वगुंतवणूक ही निवड झाल्यानंतर प्रशिक्षण चालू होण्याआगोदर भरावी लागेल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यावे लागेल, अशा अटी व शर्ती आहेत.
शेतकऱ्यांनी माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, द्वारा जिल्हा केंद्र, आय. टी. आय. शेजारी, जळगाव, संपर्क श्री. सुरवाडे, मोबाईल क्र. (9623578740), मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. ५, मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा 412806, दूरध्वनी (02168-260264) येथे संपर्क साधा, असेही जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.
महत्वाच्या बातम्या
Crop Management: शेतकऱ्यांनो भाजीपाल्यांचे करा योग्य व्यवस्थापन; उत्पादनात होईल दुप्पट वाढ
Onion Machine: आता शेतकऱ्यांचे नुकसान टळणार; कांदा सडतोय सांगणारे उपकरण लॉन्च
Castor Crop: एरंड पिकाची लागवड करा आणि कमी खर्चात मिळवा आश्चर्यकारक नफा
Share your comments