सरकार (government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबविण्यात येणारी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही पण अशीच एक योजना आहे.
दौंड तालुक्यातील शेतीपूरक उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. ही योजना शेतकरी उद्योजकांसाठी महत्त्वपूर्ण योजना असून पुणे जिल्ह्यातील 300 हून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
लाभार्थी गट
या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी (Individual beneficiaries) व गट लाभार्थी जसे शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, स्वयंसहायता गट व उत्पादक सहकारी संस्था यांना लाभ देय आहे. योजना बँक कर्जाशी निगडित असून वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकीकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% व कमाल 10 लाख मर्यादित व गट लाभार्थ्यांना दिले जाते.
सरकारच्या 'या' योजनेत फक्त 240 रुपये गुंतवा; मिळणार 50 लाखांचा नफा
मार्केटिंग व ब्रँडिंगकरिता गट लाभार्थ्यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या 50% अनुदान दिले जाते. सदस्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेअंतर्गत शेतकरी उद्योजकांनी https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे गरजेचे असल्याचे आवाहन केले आहे.
अनुदान
या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी व उद्योजकांना वैयक्तिक लाभासाठी 35% अनुदानासह 10 लाखांचं कर्ज मिळतं. तसेच या योजनेअंतर्गत जो काही टेक्निकल सपोर्ट हवाय तो ही मिळणार आहे.
सोयाबीनला मिळतोय कवडीमोल दर; आजही विकला जातोय 'या' दराने
या व्यवसायासाठी मिळेल अनुदान
मत्स्य मासे लोणचे, सुकवलेले मासे, खारवलेले मासे, गोठवलेले मासे, चिप्स, वेफर्स, पापड, फिश, समोसा, पकोडा, पीठ, पापड, बिस्कीटे, कुकीस, नाचणी सत्व, चकली, इडली, शंकरपाळी, पीठ, भगर, स्कॅश, पल्प, जाम, जेली, नेक्टर, स्लाईसेस, आईसक्रिम इत्यादी.
कँडी, पावडर, ज्यूस, चॉकलेट, चॉकलेटबार, फ्रुटबार, वडी, ड्रायफ्रूट बर्फी फ्लेक्स, आंबा पल्प, जाम, जेली, मुरंबा, स्कॅश, नेक्टर, कोकटेल, स्लाईसेस, आईसक्रिम, ड्राइड स्लाईसेस, डबाबंद ज्यूस, गोठवलेले लोणचे, चटणी, फुटबार, लश, सॉस, कुंदा, सॉफ्टकॅडी, अल्कोहल विरहित पेय, इत्यादी.
टोमॅटो केचअप, जाम, प्यूरी, टोमॅटो सॉस, पेस्ट, टोमॅटो चटणी, सूप, ज्यूस, लोणचे, पनीर, लोणी, चीझ, आईसक्रिम, तूप, लस्सी, श्रीखंड, ताक, पेये, विप क्रिम, फॅट मिल्क, दही, दूध पावडर, व्हे प्रोटीन, खवा, मावा, छन्ना, संदेश पेढा, कलाकंद, कुल्फी, रबडी, बर्फी, चक्का, श्रीखंड वडी इत्यादी.
महत्वाच्या बातम्या
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची कमाल; 'रेड बनाना' केळीचा प्रयोग यशस्वी, मिळतोय उच्चांक दर
शेतकऱ्यांनो चांगल्या उत्पादनासाठी 'या' खताचा करा वापर; होणार लाखोंमध्ये कमाई
तुम्हालाही आर्थिक तणाव जाणवत आहे? तर महत्वाच्या टिप्स करा फॉलो
Share your comments