
Farm Pond News
शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे.आता शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सरकार देत आहे १ लाख रुपयाचे अनुदान.कसे मिळेल हे अनुदान ? चला समजून घेऊया.
शेततळे म्हणजे सिंचनासाठी उत्तम उपाय ! पण त्याचा प्लास्टिक अस्तरीकरण महाग असतं. म्हणूनच सरकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातीळ शेतकऱ्यांना हे अनुदान देणार आहे.
या योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे पण त्या आधी जाणून घेऊया ,ह्या अनुदानासाठी पात्रता काय आहे?
१. अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील शेतकरी असावा.
२. शेतकऱ्याकडे वैध जात प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
३. विहीर खोदण्याच्या सुविधेसाठी कीमान ०.४० हेक्टर शेती असणे आवश्यक आहे.
४. अर्जदाराकडे सातबारा उतारा आणि ८-अ उतारा असावा.
५. बँक खाते आधार कार्ड शी लिंक असावे.
६. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न १.५ लाखापेक्षा कमी असावे. व तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
७. ग्रामसभेची शिफारस अनिवार्य आहे.
८. जर तुम्ही या अटींना पात्र असाल तर या वेबसाइट वर लगेच अर्ज करा.
(website link - https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer)
Share your comments