सध्या उसाचा हंगाम सुरु आहे. यामध्ये अनेक ठिकाणी ऊसतोड मजुरांची कमतरता भासत आहे. महाराष्ट्रात ऊस उत्पादक (Sugarcane Farming) शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. पश्चिम महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यातही काही भागात उसाचे चांगले उत्पादन घेतले जाते. असे असताना ऊस तोडणीला मजूर मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
यासाठी आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) खरेदीसाठी आता सरकारकडून पैसे मिळणार आहेत. (sugarcane harvester subsidy in maharashtra 2023) ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय कृषी मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे.
यामुळे आता ही यंत्रणा वाढणार आहे. यामुळे ऊस लवकर गाळपास जाणार आहे. या योजनेचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या निर्णयामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तोडणीच्या प्रश्न काही प्रमाणात का असेना सुटण्याची शक्यता आहे.
प्रत्येक गाव स्मार्ट होण्याची गरज, योजनेचे पुढे झाले काय?
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १९२ कोटी ७८ लाख रुपये मंजूर केले आहेत. या योजनेसाठी राज्याचा १२८ कोटींचा स्वतंत्र हिस्सा राहणार आहे. यातून ऊसतोडणी यांत्रिकीकरणास एकूण ३२० कोटी रुपये दोन वर्षांसाठी उपलब्ध होणार आहेत.
उन्हाळी खरबूज लागवडीचे तंत्र काय आहे? जाणून घ्या..
यांत्रिकीकरणाच्या मदतीने आता शेतकरी आपला ऊस वेळेत साखर कारखान्यांकडे पाठवू शकतील आणि ऊसाचे वजन कमी होण्याच्या शक्यता टाळू शकतील तसेच वेळेवर मोबदला मिळवू शकतील. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
आगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणार भेट, PM किसान सन्मान निधीची रक्कम वाढण्याची शक्यता...
शेतकऱ्यांनो म्हशींच्या या जाती आहेत दुधासाठी फायदेशीर, जाणून घ्या..
सुक्ष्म जिवाणू व जमीन पोत...
Share your comments