मृदा आरोग्य कार्ड योजना: मृदा आरोग्य कार्ड योजना म्हणजेच मृदा आरोग्य योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. ज्या अंतर्गत शेतकरी आपल्या शेतातील माती सुपीक आणि चांगली बनवू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीकही चांगले येईल आणि त्यांना अधिक नफाही मिळेल. या योजनेत शेतकऱ्यांना शेतातील मातीच्या गुणवत्तेच्या आधारे अनुकूल पिके घेण्यास मदत केली जाईल.
मृदा आरोग्य कार्ड योजना काय आहे?
विशेषतः शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना एक कार्ड दिले जाते आणि त्याच कार्डवरून शेतजमिनीची माती कोणत्या प्रकारची आहे याची माहिती मिळते. याद्वारे शेतकरी आपल्या जमिनीच्या आधारे पिकांची पेरणी करून चांगला नफा मिळवू शकतात. सरकारच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या गुणवत्तेनुसार तीन वर्षांतून एकदा मृदा आरोग्य पत्रिका दिली जातात.
मृदा आरोग्य कार्ड कसे काम करेल ते जाणून घ्या;
यामध्ये सर्व प्रथम अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने घेतात.
त्यानंतर ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात.
त्यानंतर तपास पथक मातीच्या नमुन्याची तपासणी करून त्याचा दर्जा सांगतो.
शेतातील मातीत काही कमतरता आढळल्यास अधिकारी त्या सुधारण्याच्या सूचना देतात.
त्यानंतर शेतकऱ्याच्या नावासह अहवाल ऑनलाइन अपलोड केला जातो.
मृदा आरोग्य कार्डासाठी अर्ज कसा करावा;
यासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइट soilhealth.dac.gov.in वर जा.
त्यानंतर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल, लॉगिन ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर दिसणार्या पेजवर तुमचे राज्य निवडा आणि Continue वर क्लिक करा.
मोठी बातमी! डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर, मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट
त्यानंतर लॉगिन पेज ओपन केल्यावर Registration New User च्या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल.
महत्वाच्या बातम्या;
फक्त १८ दिवसात तयार होणारे हे खत शेतकऱ्यांना देत आहे नवसंजीवनी, घरीच करा तयार...
तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय..
पावसाअभावी शेती संकटात, कृषीमंत्र्यांची पीक मदत योजनेवर काम सुरू करण्याची घोषणा
Share your comments