राज्यामध्ये फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना आणून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. यातीलच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड किंवा शेताच्या बांधावरील झाडांची लागवड असो किंवा सलग क्षेत्रातील वृक्षलागवड व फुल पिके त्यांच्या लागवडीसाठी सरकारकडून अनुदान दिले जाते.
आता सरकारने या बाबतीत एक नवीन अंदाज पत्रक काढत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या फळबाग, वृक्ष लागवड आणि फुल पीक अनुदानात वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
नेमके कसे आहे स्वरूप?
मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभार्थीच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृतमहोत्सवी फळझाड वृक्षलागवड व फुल पीक लागवड योजनेअंतर्गत आर्थिक मापदंड बाबत या शासन निर्णयामध्ये नवीन मनरेगा अंतर्गत अकुशल साठी देण्यात येणारी 256 रुपये प्रतिदिन ही मजुरी ग्राह्य धरून या मजुरीच्या आधारे 15 जुलै 2022 रोजी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे.
नक्की वाचा:सेंद्रिय शेती करायची आहे ना? तर नका घेऊ टेंशन,'या' योजनेची होईल तुम्हाला मदत
या बाबींसाठी मिळते अनुदान
या योजनेच्या माध्यमातून काजू, पेरू, डाळिंब, मोसंबी, संत्री, लिंबू, बोर, आंबा, सिताफळ, चिंच, जांभूळ, कोकम, फणस आणि अंजीर अशा प्रकारच्या विविध फळांची लागवड साठी अनुदान देण्यात येते तसेच सुपारी, शेवगा, बांबू आणि नवीन ड्रॅगन फ्रुट लागवड यासाठी
या नवीन अंदाजपत्रकानुसार दिला जाणारा खर्च यामध्ये देण्यात आला आहे. त्यामध्ये लागवडी अगोदरची पूर्वमशागत, जमीन तयार करणे तसेच फळबाग लागवडीसाठी खड्डे खोदणे, लागवडीनंतर संवर्धन व माती, शेणखत घालने अशा प्रकारची काही विविध कामे असतात या कामासह या लागवडीसाठी खर्च दिला जाणार आहे.
एवढेच नाही तर या योजनेअंतर्गत फूलपिक लागवडीसाठी देखील अनुदान दिले जाते. फुलपिक लागवडीसाठी देखील अंदाजपत्रक या योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहे. या योजनेच्या अनुदानात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून फळबाग लागवडीला चालना मिळण्यास मदत होईल व आर्थिक फायदा देखील मिळू शकणार आहे.
नक्की वाचा:EDLI योजना ठरते ईपीएफओ सदस्यांसाठी एक वरदान, नेमकी काय आहे ही योजना? जाणून घ्या सविस्तर
Share your comments