केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजना राबवण्यामागे सरकारचा हेतू आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात आर्थिक मदत होऊन शेतीमध्ये आर्थिक उन्नती करता यावी हा महत्वाचा उद्देश आहे. शेती करत असताना जर आपण बियाण्यांचा विचार केला तर बियाणे हे दर्जेदार व प्रमाणित असले तर शेतकऱ्यांना मिळणारे उत्पादन देखील दर्जेदार मिळते.
नक्की वाचा:दिलासादायक! सौर पंपासाठी तब्बल १५ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर
या पार्श्वभूमीवर आपण काही कडधान्ये व तृणधान्ये पिकांचा विचार केला तर त्यांचे लागवड क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून एक महत्वपूर्ण अनुदान योजना राबविण्यात येत असून
या माध्यमातून कडधान्ये व तृणधान्ये वर्गातील पिकांच्या नवीन वाणांचा प्रसार व प्रचार व्हावा व शेतकऱ्यांना दर्जेदार व प्रमाणित बियाणे अनुदानावर उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून अनुदानित दराने
बियाणे देण्यात येत आहे.यासाठी पीक प्रात्यक्षिक अंतर्गत रब्बी ज्वारी,करडई आणि हरभरा या पिकासाठी सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावेत असे आव्हान अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरिफ शहा यांनी केले आहे.
काय आहे नेमकी ही योजना?
या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे व कडधान्ये व तृणधान्ये पिकांच्या नवनवीन वाणांचा प्रसार व प्रचार व्हावा
यासाठी हरभरा पिकाच्या दहा वर्षाच्या आतील वानास 25 रुपये प्रति किलो तसेच रब्बी ज्वारी पिकाचा दहा वर्षावरील वाणास पंधरा रुपये प्रतिकिलो अनुदानित दराने बियाणे देण्यात येत आहे. कृभको, महाबीज तसेच राबिनी अमरावती, केवीके मार्फत त्यांच्या अधिकृत वितरकांच्या माध्यमातून तालुकानिहाय हरभरा व ज्वारी पिकाच्या प्रमाणे बियाण्याचे वितरण करण्यात येत आहे.
कसा मिळेल हा लाभ?
या माध्यमातून पीक प्रात्यक्षिके अंतर्गत हरभरा,करडई तसेच रब्बी ज्वारी इत्यादी पिकांसाठी सर्वसाधारण,अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अत्यल्प किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर एका गावातील लॉटरीमध्ये जे 25 शेतकरी निवडले जातील त्यांना शंभर टक्के अनुदानावर पिक प्रात्यक्षिकाचा लाभ मिळू शकणार आहे.
Share your comments