पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे PM किसान योजनेचा 15 वा हप्ता आज 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच आज पंतप्रधान मोदी 18,000 कोटी रुपयांचा निधी जारी करतील, यामुळे 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
आत्तापर्यंत या योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथील कार्यक्रमादरम्यान वितरण करण्यात आला होता. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (eKYC) करणं बंधनकारक आहे. त्यामूळे eKYC न केल्यास शेतकऱ्यांचं 2 हजार रुपयांचे नुकसान होऊ शकते.
या योजनेची लाभार्थी यादीत तुमचे नाव असे शोधा -
सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे.
त्यानंतर उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरचा पर्यायावर क्लिक करा .
येथे Beneficiary Status या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
तिथे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यांपैकी एक टाका.
त्यानंतर Get Data वर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल.
Share your comments