पूर्वीच्या काळी मुलींना शिकवले जात नव्हते, त्यांना चार भिंतीच्या पलिकडलं जग माहीत नव्हतं. 'जिच्या हाती पाळण्याची दोरी दोरी, ती जगाला उद्धारी' या उक्ती प्रमाणे त्यांना वागवले जात असत. 'चूल आणि मूल 'एवढेच त्यांना सांगितले जायचे. मुलींना लिहिण्या-वाचण्याची परवानगी नव्हती त्यांना फक्त घरचे कामे करावी, असे सांगितले जायचे. परंतु आताच्या काळात चित्र बदललेले दिसते, आज मुलींनी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवले आहे.
मुली अभ्यासच नाही तर नोकरीतही मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे. पण हळूहळू त्यांच्या पुढे जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहेत, त्याचा त्यांना थेट फायदा होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारची राणी लक्ष्मीबाई योजना आहे, ज्याचा लाभ राज्यात राहणाऱ्या मुलींना लवकरच मिळणार आहे.
हेही वाचा : Govenment Scheme: आता सरकार प्रत्येकाला देणार महिन्याला 10,000; मात्र करावे लागेल हे काम
या योजने बद्दल जाणून घ्या -:
या योजनेचे नाव आहे, राणी लक्ष्मीबाई योजना, जी उत्तर प्रदेश सरकार लवकरच राज्यातील मुलींना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना मोफत स्कूटी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात या योजनेची माहिती दिली आहे. राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत गुणवंत मुलींना मोफत स्कुटी देण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात भाजपचा जाहीरनामा त्याचा उल्लेख होता. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींना मोफत कोटी दिले जाईल. मुलींना स्वावलंबी बनवण्याचे उद्देशाने ही योजना सुरू करण्यात येणार आहे. सरकारी महाविद्यालय, विद्यापीठ व्यतिरिक्त खासगी विद्यापीठांचे विद्यार्थीही या योजनेचा लाभ घेऊ शकतील. ही योजना लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. योगी आदित्यनाथ सरकारकडून हिरवा सिग्नल मिळताच पात्र विद्यार्थिनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
कोणती कागदपत्रांची आवश्यकता आहे -:
*आधार कार्ड
*अधिवास प्रमाणपत्र
*वय प्रमाणपत्र
*पासपोर्ट आकाराचा फोटो
*शैक्षणिक कागदपत्रे.
Share your comments