
news for pf holder
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची येत्या 29 आणि 30 जुलै रोजी महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीमध्ये केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार आहे.
या प्रणालीच्या स्थापनेमुळे देशभरात 73 लाख पेन्शन धारकांच्या खात्यावर निवृत्तीवेतन एकाच वेळी जमा केले जाणार आहे. जर आपण सध्याच्या स्थितीचा विचार केला तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची 138 प्रादेशिक कार्यालय असून त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या खात्यात टेन्शन पाठवत असतात.
अशा परिस्थितीत पेन्शनधारकांना वेगवेगळ्या दिवशी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी पेन्शन मिळते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओ ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या अर्थात सीबीटी च्या 29 आणि 30 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणालीचे स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येईल.
नक्की वाचा:EPFO NEWS: 73 लाख पेंशनधारकांसाठी आनंदाची बातमी, ईपीएफओ ने केली 'ही' मोठी घोषणा
ही प्रणाली बसवल्यानंतर 138 क्षेत्रीय कार्यालयांच्या डेटाबेसच्या आधारे पेन्शनचे वितरण केले जाईल. यामुळे जवळ-जवळ देशभरातील 73 लाख पेन्शन धारकांना एकाच वेळी पेन्शन दिली जाणार आहे असे सूत्रांनी सांगितले.
पीएफ खाते ट्रान्सफर करण्याचा वाचणार त्रास
केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली लागू झाल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आता धारकांना अनेक फायदा मिळणार असून यात डुप्लिकेशन होणार नाही.
याचवेळी खाते धारकांचे अनेक पीएफ खाती विलीन होत एकच सिंगल खाते तयार करण्यात येईल. जर कोणी नोकरी बदलली तर संबंधित खात्याला ट्रान्सफर करण्याचा त्रास होणार नाही.
नक्की वाचा:जनधन खातेदारांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकार देणार 3 हजार रुपये
किती येणार पेन्शन?
सरकार लवकरच पेन्शनचे व्याज जमा करण्याची शक्यता असून जर तुमच्या पीएफ खात्यामध्ये सात लाख रुपये असतील तर आपल्याला 8.1 टक्के व्याज दराने 56 हजार रुपये खात्यात जमा होतील.
याचा फायदा जवळजवळ सहा कोटी खातेधारकांना होणार आहे.
पैसे कधीही काढता येतील?
केंद्रीय विश्वस्त मंडळ सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी साठी योगदान दिलेल्या खातेधारकांना पेन्शन खात्यातून ठेवी काढण्याची परवानगी देण्याच्या प्रस्तावावर देखील विचार करीत असून तो मंजूर होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा:मोदी सरकारच्या या योजनेत मिळणार मुलीच्या लग्नासाठी 65 लाख; कसं ते जाणून घ्या
Share your comments