भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. यामुळे देशातील शेतकरी सक्षम असणं अति महत्वाचे आहे. आर्थिक दृष्ट्या शेतकरी बांधव सक्षम झाले तरचं देशाची अर्थव्यवस्था रात दोगुणी दिन चौगुणी प्रगती करेल नाहीतर देशाचा विकासचं होणार नाही.
यामुळे देशातील शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी देशातील सरकार तसेच प्रत्येक राज्यातील राज्य सरकार देखील वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात. अनेक नावीन्यपूर्ण शेतकरी हिताच्या योजना अंमलात आणतात. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातो. अशीच एक सरकारी योजना आहे पीएम किसान मानधन योजना. या योजनेंतर्गत वृद्ध शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी 36 हजार रुपये पेन्शन स्वरूपात देत असते.
काय आहे किसान मानधन योजना - मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत सरकार वृद्ध शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन देते. मात्र, ही एक पेन्शन योजना आहे म्हणुन या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या या योजनेत दरमहा काही पैसे जमा करावे लागतात. या योजनेत 18 वर्षांवरील तरुणांपासून 40 वर्षांवरील शेतकऱ्यांना सामाविष्ट होता येते.
किती पैसा जमा करावा लागतो - पीएम किसान मानधन या पेन्शन योजनेच्त नियमांनुसार शेतकऱ्यांना दरमहा 55 ते 200 रुपये प्रीमियम भरावा लागतो. म्हणजेच हा पैसा पेन्शन फंडात जमा करावा लागतो. आणि जेव्हा शेतकऱ्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त होते तेव्हा त्यांना दरमहा तीन हजार रुपये मासिक पेन्शन दिले जाते. मित्रांनो आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, जर एखाद्या शेतकऱ्याचे आता 18 वय असेल तर त्याला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील आणि जर त्याचे वय 40 असेल तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील.
योजनेसाठी नोंदणी कशी करावी?- मित्रांनो जर एखाद्या शेतकऱ्याला पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अशा संबंधित शेतकऱ्याला या योजनेत नोंदणी करावी लागेल. या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे या योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे नोंदणी करता येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करायची असेल, अशा शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन नोंदणी करावी लागेल. कॉमन सर्विस सेंटर वर संबंधित शेतकऱ्यांना या योजनेसाठी काही कागदपत्रे देखील सबमिट करावे लागतात.
याशिवाय, ऑनलाइन पद्धतीने देखील या योजनेसाठी नोंदणी करता येणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्याला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आणि त्यानंतर नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्याला स्व-नोंदणी करावी लागेल. यासाठी संबंधित शेतकऱ्याला मोबाईल नंबर, ओटीपी इत्यादींची माहिती त्या ठिकाणी भरावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Share your comments