शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार कडून नेहमीच विविध योजना राबवल्या जात असतात. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC)योजना. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्जही उपलब्ध करुन देत आहे. KCC अंतर्गत, शेतकरी 5 वर्षांत 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. या योजनेत शेतकरी 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय घेऊ शकतात.
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. तसेच आता फक्त 14 दिवसात किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. केंद्र सरकारची केसीसी सॅच्युरेशन ड्राइव्ह मोहीम ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेपासून सुरू झाली असून संपूर्ण महिनाभर सुरू राहणार आहे. म्हणजे हे कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्याकडे 31 ऑक्टोबरपर्यंतची वेळ आहे. तसेच पशुपालन, मत्स्यपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तरीही KCC कडून कर्ज घेऊ शकते.
किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे -
ड्रायव्हिंग लायसन्स
आधार कार्ड
मतदार ओळखपत्र
सातबारा उतारा 8 अ
दुसऱ्या बॅंकेचा कर्जदार नसायल्याचे प्रतिज्ञा पत्र
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा -
या अधिकृत https://pmkisan.gov.in/ वरून किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म डाउनलोड करावा आणि जमिनीची कागदपत्रे, पीक तपशीलांसह भरावा.
त्याचबरोबर आधी इतर कोणत्याही बँकेतून किसान क्रेडिट कार्ड बनवलेले नाही याचीही माहिती द्यावी लागेल.
Share your comments