1. सरकारी योजना

शेतकऱ्यांनो शेवटची संधी! 90 टक्के अनुदानावर शेतात सौरपंप बसवण्यासाठी नाव नोंदणी सुरू, वाचा सविस्तर

योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. यामुळे शेतकरी अनेक योजनांपासून वंचीत राहतो. आता शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतात सौरपंप बसवावेत यासाठी कुसुम योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. देशातील अनेक राज्यात शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे. आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही कुसुम योजनेअंतर्गत नाव नोंदणी सुरु झाली आहे.

farmers Registration installation solar pumps

farmers Registration installation solar pumps

शेतकऱ्यांचे आयुष्य सुधारावे आणि त्यांना चार पैसे मिळावेत यासाठी सरकारकडून विशेष प्रश्न केले जातात, असे असताना मात्र त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. यामुळे शेतकरी अनेक योजनांपासून वंचीत राहतो. आता शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतात सौरपंप बसवावेत यासाठी कुसुम योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात सौरपंप बसवण्यासाठी ३० टक्के अनुदान दिले जाते. यामुळे ही योजना फायदेशीर आहे.

देशातील अनेक राज्यात शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे. आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही कुसुम योजनेअंतर्गत नाव नोंदणी सुरु झाली आहे. कुसुम योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांना ३० टक्के आर्थिक मदत मिळणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचा वाटा १० टक्के असून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अंतर्गत येणार्‍या लाभार्थ्यांचा वाटा ५ टक्के आहे. उर्वरित ६० ते ६५ टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे.

यामुळे ही रक्कम जवळपास ९० टक्क्यांवर जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये महाऊर्जाच्या स्वतंत्र पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे. कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्या टप्प्यात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत १० हजार ८३९ लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे. लवकरच त्यांना याचा लाभ मिळणार आहे. तुम्हीही सहज यासाठी अर्ज करू शकता. यामुळे शेतकर्‍यांना सिंचनासाठी २४ तास वीज मिळत असल्याने विजेचा खर्च कमी होत आहे.

महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ! जगनमोहन रेड्डींच्या आई विजयलक्ष्मींचा मुलाच्या पक्षाला रामराम

इच्छुक शेतकरी या योजनेंतर्गत अर्ज करू शकतात आणि सौर पंपावरील अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. यासाठी या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तुम्हाला पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर संदर्भ क्रमांकासह लॉगइन करावे लागेल. पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, तुम्ही कुसुम सोलर पंपसाठी ऑनलाइन अर्ज भरू शकता. होम पेजवर लागू करा बटणावर क्‍लिक करावे. अर्ज करा बटणावर क्‍लिक केल्यावर, शेतकर्‍याला नोंदणी फॉर्म भरावा लागेल.

शेतकऱ्यांनो काळजी घ्या, आता बनावट कीटकनाशके बाजारात, अशी करा खात्री...

यानंतर तुम्हाला कुसुम योजनेचा अर्ज स्क्रीनवर दिसेल. या अर्जामध्ये सर्व माहिती अचूकपणे भरावी. शेतकर्‍याचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल पत्ता आणि इतर माहिती यासारखे तपशील त्यात भरावे. यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्‍लिक करावे. अर्ज सबमिट केल्यावर, शेतकर्‍याला यशस्वीरित्या नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. असा संदेश प्राप्त होईल. यानंतर तुम्हाला याचा लाभ मिळेल.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
अशी शेती केली तर शेतकऱ्यांची पण लग्न होतील!! पट्ठ्याने बँक मॅनेजरच्या नोकरी सोडून केली शेती, आज लाखो कमवतात
बकरी ईद निमित्त ताजमहलमध्ये जाणारांसाठी आनंदाची बातमी, प्रशासनाचा निर्णय..

English Summary: farmers Registration installation solar pumps field 90 percent subsidy started Published on: 10 July 2022, 11:19 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters