गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याची मागणी केली जात आहे. असे असताना याकडे लक्ष दिले गेले नाही. आता शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने'च्या अंमलबजावणीवर भर देण्यात येत आहे.
यासाठी आता राज्यात अडीच हजार मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना चालना देण्यात आली आहे. राज्यात ५४६ मेगावॅटचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यरत झाले आहेत, तर ऊर्वरित प्रकल्पांपैकी काही अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर तर काही निविदाप्रक्रियेत आहेत.
याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. याबाबत महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी माहिती दिली. शेतकरी अनेक दिवसांपासून याबाबत मागणी करत होते. सध्या एकूण ५४६ मेगावॅट वीज निर्मितीचे विविध प्रकल्प सुरू झाले आहेत.
उगीच कोणी शेतकरीराजा म्हणत नाही!! शेतकरी घालतोय हार्ले डेव्हिडसनवर दूध, बघणारे गेलेत कोमात
यामधून याचा लाभ ९०,००० शेतकऱ्यांना मिळत आहे. एकूण सुमारे एक हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीच्या विविध प्रकल्पांच्या निर्मितीचे काम वेगवेगळ्या टप्प्यांवर सध्या चालू आहे. तसेच ५५० मेगावॅट वीज निर्मितीच्या विविध सौर ऊर्जा प्रकल्पांसाठीची निविदा जारी करण्यात आल्या आहेत.
ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
तसेच ४५० मेगावॅट वीज निर्मितीच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठीची आणखी एक निविदा जारी झाली असून त्याची मुदत ३० जानेवारी आहे. एकूण अडीच हजार मेगावॅट विजेची सौर ऊर्जेद्वारे निर्मिती करून ती वीज शेतकऱ्यांना दिवसा पुरविण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या;
बारामतीत सुरू होतेय नवीन कृषिपर्व! वॉशिंग्टन नंतर जगातील दुसरे संशोधन केंद्र बारामतीत, शरद पवार, ऑक्सफर्डचे संचालक उपस्थित
समृद्धी महामार्गाची खरी कहाणी! आलिशान गाड्या, कोट्यावधीचे बंगले आणि बक्कळ पैसा, शेतकरी मालामाल
जमिनीचा ताबा मिळावा म्हणून स्वतःलाच जमिनीत गाडून घेतले, शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन
Share your comments