सध्या राज्यात जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. असे असताना आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत केली जाणार आहे.
याबाबत शासन निर्णय GR निघाला आहे. याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. दरम्यान, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई म्हणून मदत देखील दिली जाणार आहे.
असे असताना मात्र निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे काय होणार असा प्रश्न होता. यामुळे आता हा प्रश्न निकाली निघाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत शासन निर्णय काढून जिल्ह्यांना निधी वितरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटणार? ३५ साखर कारखान्यांनी घेतली ऊस गाळप सुरू करण्याची परवानगी
त्यानंतर मदत व पुनर्वसन विभागाने 755 कोटी रुपयांच्या निधीचे औरंगाबाद, अमरावती आणि पुणे विभागातील नऊ जिल्ह्यांना वितरण करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यामध्ये जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळणार आहे.
गहू उत्पादक राज्यात गव्हाचा तुटवडा, किंमतीत 5 टक्क्यांची वाढ..
यामुळे आता शेतकरी समाधानी आहेत, अनेकदा नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या तशा तक्रारी आहेत. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
Farmer Income: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असल्याचे माझ्याकडे पुरावे, केंद्रीय कृषिमंत्र्यांचा दावा
Maharashtra Monsoon: उद्यापासून परतीचा मान्सून माघारी फिरणार, शेतीच्या कामांना येणार वेग..
50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची ऑनलाईन यादी जाहीर, शेतकऱ्यांनो तुमचं नाव करा चेक..
Share your comments