सर्वसामान्य लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकार नवनवीन योजना (new scheme) राबवत असते. यानुसार आपण पाहिले तर आता राज्य सरकारने वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृतांच्या नातेवाईकांना मोठी मदत करण्याचा निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्यात मृतांच्या नातेवाईकांना 20 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासह जखमी आणि पशुहानी झाल्यास देण्यात येणाऱ्या मदतीतही मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Govt) घेतला आहे. किती वाढ करण्यात आली? याविषयी आपण माहिती जाणून घेऊया.
शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय; पीक विम्यासाठी 187 कोटी मंजूर
पाळीव प्राण्यांसाठी
गाय, म्हैस आणि बैलाचा मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या (market price) ७५ टक्के किंवा ७० हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येणार आहे.
तसेच कायमचे अपंगत्व आल्यास बाजारभावाच्या ५० टक्के किंवा १५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती, मेंढी, बकरी आणि इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा १५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येणार आहे.
तसेच पाळीव जनावरांच्या औषधोपचारासाठी खर्च देण्यात येणार आहे. हे औषधोपचार शासकीय (Medication Govt) किंवा जिल्हा परिषदेच्या पशुचिकित्सालयांमध्ये मोफत करण्यात येतील.
या शुभ मुहूर्तावर करा लाडक्या बाप्पाची स्थापना; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि इतर खास गोष्टी
या आधी हत्तीमुळे झालेल्या हानीपोटी ५० हजार ते एक लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्यात वाघ, बिबट्या, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, मगर, हत्ती, रानकुत्र्यांच्या हल्ल्यांत अलीकडे मोठी वाढ झाली आहे.
यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावा लागला आहे. तसेच अनेकदा गायी, म्हशी, बैल, शेळ्या मेंढ्यांवरही हल्ले होतात. या हल्ल्यांत पशुहानीही होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास 75 टक्के रक्कम दिली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
खरीप पिकांमध्ये आंतरमशागतीचे नियोजन करा तंत्र पद्धतीने; चांगल्या उत्पादनासाठी होणार मदत
दिवसाला फक्त 45 रुपये वाचवून 25 लाखांचे मालक व्हा; एलआयसीची 'जीवन आनंद योजना' देत आहे संधी
आता महावितरण ठेवणार नजर; नुकसान भरून काढण्यासाठी राबविली जाणार 'ही' मोहीम
Share your comments