राज्य शासनाकडून या वर्षीपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यात योजनेची अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर रोजी वितरण करण्यात आले आहे. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. याचे कारण अन्य कारणांसोबतच बँक खात्याशी संबंधीत काही बाबी असल्याचे समोर आले आहे.
सर्वात अगोदर शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन बँक खाते संबंधीत तपासणी करावी खाली दिलेली कोणतीही बाब आढळल्यास त्यात लगेचच सुधारणा करून घ्यावी. बँक खाते बंद असणे, बँकेकडून बँक खाते बंद केलेले असणे, आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसणे, बँकेने खात्यावर क्रेडिट मर्यादा निश्चित केलेली असणे, बऱ्याच कालावधीपासून बँक खाते वापरात न ठेवल्याने बँकेने ते खाते डॉर्मंट केलेले असणे, केवायसी अपूर्ण असणे.
तसेच बंद असलेले खाते तातडीने सुरू करुन द्यावे. बँकेने एनपीसीआय पोर्टलवरून आधार क्रमांक डीसीडेड केल्यास किंवा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसल्यास बँकेशी संपर्क साधणे गरजेचे आहे. नाही तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे पैसेही संबंधीत बँक खात्यात जमा होणार नाहीत. त्यामुळे बँक खाते सुरु असल्याची खात्री करावी, असे आवाहन बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
Share your comments